World Postal Day
World Postal Day  sakal
पश्चिम महाराष्ट्र

World Postal Day : सांगलीचा टपाल विभाग देशात अव्वल

विष्णू मोहिते

सांगली : मोबाईल युगाच्या अभूतपूर्व क्रांतीनंतर वैयक्तिक संदेशवहनासाठी टपालाचा वापर कमी होत असताना, टपाल विभागाने आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून या खात्याचे अस्तित्व, उपयुक्तता काळानुसार टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. देशात एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयांमार्फत ‘इंडिया पोस्ट’चा कारभार देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. सांगली जिल्ह्यात ४१९ पोस्ट कार्यालये आहेत. त्यात ८२ विभागाची आहेत. दोन मुख्यालय, ८० उपकार्यालये आणि ३२७ ग्रामीण भागात कार्यालये आहेत. ५५० प्रशिक्षित कर्मचारी व्याप सांभाळताहेत.

सुरवातीला पत्र, आंतरदेशीय पत्र, तार अत्यंत दुर्गम भागातही पोचवणाऱ्या टपाल सेवेच्या जाळ्यामार्फत नंतर अल्पबचत आणि अन्य वित्तीय सेवाही सुरू झाल्या. टपाल क्षेत्रात संदेशवहन साधनांची आधुनिकता व खासगी कुरियर कंपन्यांचे आगमन झाल्यानंतर टपाल खात्याने सर्व टपाल कार्यालयांचे संगणकीकरण, हवाई टपाल वाहतूक, ‘ट्रॅक अँड ट्रेस’ व मेसेज सुविधा वापरून ग्राहकांना आधुनिक सुविधा दिल्या. त्यामुळे व्यापारी टपालांचे प्रमाण अन्य कुरियर कंपन्यांपेक्षा जास्त प्रमाणात टपाल खात्यामार्फत वितरित होत आहे. यासाठी स्पीड पोस्ट, बिझनेस पार्सल, कॅश ऑन डिलिव्‍हरी, ई-पोस्ट सेवा ‘बुक नाऊ प्ले लेटर’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम खात्याने केले आहे.

बॅंकिंग क्षेत्राचा विचार करता खात्यामधील ‘अल्पबचत योजना’ या सर्वांत लोकप्रिय, विश्वासू व सर्वाधिक व्याज देणाऱ्या आहेत. ग्राहकांना अत्याधुनिक सेवेचा लाभ देताना खात्याने ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट, एटीएम सुविधा, आयपीपीबी ॲपद्वारे इंटरनेट बँकिंग सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना देशातील कोणत्याही पोस्टात व्यवहार करणे अथवा घरबसल्या पैसे गुंतवणे शक्य आहे. विमा क्षेत्रामध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय) व ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) यांच्या माध्यमातून सर्वाधिक बोनस व कमी हप्ता, ऑनलाइन हप्ता भरण्याची सोय, पासबुक सुविधा, कर्जसेवांचा लाभ ग्राहकांना देण्याचा प्रयत्न टपाल खात्याने केल्याने शहरी व ग्रामीण भागातील विमेदारांचे हित जपण्याचे काम टपाल खाते करत आहे.

सांगलीच्या टपाल विभागाने ग्रामीण डाक जीवन विमा योजनेंतर्गत जुलै ते सप्टेंबर २०२२ या चार महिन्यांत सुमारे ५ कोटींचा विक्रमी विमा हप्ता गोळा केला. गेल्या चार महिन्यांत देशात प्रथम क्रमांक पटकाविला. सुकन्या व सुरक्षा योजना घेऊन सर्व कर्मचारी लोकांच्या घराघरांपर्यंत जात आहेत. पोस्ट कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

- रमेश पाटील, प्रवर डाक अधीक्षक, सांगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT