wrestler mauli jamdade win at kavthepiran
wrestler mauli jamdade win at kavthepiran  
पश्चिम महाराष्ट्र

कवठेपिरान मैदानात माऊली जमदाडेची गणेश जगतापवर मात...

सकाळवृत्तसेवा

सांगली - कवठेपिरान (ता. मिरज) येथे श्री सप्तर्षी (सातसय्यद) यात्रेनिमित्त आयोजित मैदानात माऊली जमदाडेने बाजी मारली. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत त्याने गणेश जगतापला अवघ्या पाच मिनिटात पोकळ घिस्सा डावावर चितपट केले. हिंदकेसरी दीनानाथसिंह व माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी पंच म्हणून काम पाहिले. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लांच्या लढती झाल्या. शौकिनांची गर्दी होती.

दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत किरण शिंदेने आकडी डावावर विराप्पा अथगीला तिसऱ्या मिनिटाला आस्मान दाखवले. कवठेपिरानच्या प्रवीण साळुंखेने शुभम पवारवर पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला. सरदार सावंत, बाळू अपराध, मारूती सूर्यवंशी, अरविंद सावर्डे, प्रमोद येवले, कृष्णात येवले, नीलेश पाटील, योगेश पाटील, सुनील करवते, भूषण पवार यांच्यासह कुस्तीपटूंनी नेत्रदीपक कुस्त्या करून दाद मिळवली.
कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, पोलिस निरीक्षक चद्रकांत बेंदरे, गौरव नायकवडी, सागर पाटील, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भीमराव पाटील, पोपट पाटील, विनोद देसाई, प्रभाकर देसाई, सुनील विधाते उपस्थित होते. बंडा सायमोते, उदय खंबाळे, जालिंधर दिंडे, अर्जुन वडगावे, अमोल  खंबाळे, रधुनाथ दिंडे, बंडा तामगावे, पिराजी माळी,  मकान गवळी यांनी पंच म्हणून काम पहिले. शंकर पुजारी, जोतीराम वाजे, रामदास गायकवाड यांनी निवेदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT