Wrestling Sports Calendar Made By Uttamrao Patil
Wrestling Sports Calendar Made By Uttamrao Patil 
पश्चिम महाराष्ट्र

अशी आहे कुस्ती खेळाची दिनदर्शिका ?

सकाळ वृत्तसेवा

सांगली - कॅलेंडरच्या चौकोनात संकष्टी, अमावस्या, पौर्णिमा, शुभ दिवसांची नोंद सर्वांना सवयीची मात्र या दिनदर्शिकेत मात्र कुस्ती खेळाविषयीचे सारे काही आहे. आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांनी यंदा हा उपक्रम राबवला आहे. कुस्ती खेळाला प्रोत्साहन मिळावे हा त्या मागचा उद्देश आहे.

पैलवानांच्या गरजा लक्षात घेऊन या दिनदर्शिकेत बऱ्याच गोष्टी आहेत. ती पैलवानांना मोफत द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. श्री. पाटील यांना कुस्तीचा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास तोंडपाठच आहे. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्रात प्रशिक्षक म्हणून त्यांनी शेकडो मल्ल घडवले. कवलापूर येथे त्यांनी स्वखर्चातून त्यांनी अद्ययावत तालीम उभी केली आहे. आजही त्यांचा सारा दिवस कुस्तीतच व्यतीत होतो. 

पैलवानासाठी माहितीचा खुराकच

गेले काही दिवस राबून कुस्ती विशेषांक दिनदर्शिका बनवली. दिनदर्शिकेत ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक कास्यपदक पटकावणारे खाशाबा जाधव यांच्यापासून 2012 मध्ये सहभागी नरसिंग यादवपर्यंत मल्लांची माहिती या दिनदर्शिकेत आहे. कुस्तीमधील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त महानमल्ल, कुस्तीतील ऑलिंपिक पदक विजेते मल्ल, महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील नामवंत मल्ल, पहिले महाराष्ट्र केसरी, कुस्तीतील कीर्तिवंत मल्ल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय शालेय खेळातील 82 क्रीडा प्रकार, शालेय कुस्ती स्पर्धेसाठी वयोमर्यादा, आजवरच्या ऑलिंपिक स्पर्धांची माहिती तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा आणि परिसरातील प्रमुख मैदाने, त्यांच्या तारखा व माहिती नमूद आहे. पैलवानासाठी हा माहितीचा खुराकच आहे. 

कुस्तीपटूंना उपयुक्त माहिती

"आम्ही दरवर्षी ही दिनदर्शिका काढणार आहोत. राज्यातील प्रत्येक मल्लापर्यंत ती पोहचवणार आहोत. कुस्तीपटुंना उपयुक्त ठरेल अशी माहिती त्यात वाढवत राहू. राज्य अधिवेशनात तीचे वाटप होईल.'' 
- उत्तम पाटील, कुस्ती प्रशिक्षक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT