Yadav inscription found at Kudnur in Jat taluka 
पश्चिम महाराष्ट्र

जत तालुक्‍यात कुडनूरला सापडला यादवकालीन शिलालेख 

प्रमोद जेरे

मिरज : जत तालुक्‍यातील कुडनूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाला. सिंगणापूरातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपासून या दोघांचे संशोधन सुरू आहे. 

हा शिलालेख मारुती मंदिराशेजारील रस्त्यावर भंगलेल्या अवस्थेत होता. तालुक्‍यात चालुक्‍य आणि यादवकालीन काही शिलालेख मिळाले आहेत. जत तालुक्‍याच्या किमान एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गेली काही वर्षे जत तालुक्‍यातील याच शिलालेखांवर अभ्यास करीत आहेत. यात त्यांना जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या कुडनूरला मारुती मंदिराच्या पश्‍चिम बाजूस असलेल्या रस्त्यालगत भंगलेल्या अवस्थेतील शिलालेख आढळला. 

कुडनूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतिश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा. काटकर, कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती. 
शिलालेखाचे दोन भाग झाले होते. शिलालेखावर वरच्या बाजूला गाय, सुर्य-चंद्र व शस्त्र अशी चित्रे कोरली आहेत. इतिहास अभ्यासक प्रा. काटकर, कुमठेकर यांनी सदर लेख उतरुन घेऊन तज्ञांकडून वाचन करून घेतले. यात नऊ ओळी आहेत. वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. सदर लेखात सिंगणापूर येथील श्री सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंघणेश्वर या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. 

सध्याच्या कुडनूरजवळच सिंगणापूरचे गांव आहे. या गावात असलेल्या महादेवांच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र, सध्या अशा नावांची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरुन आणि लिपीवरुन हा लेख उत्तर यादव काळातील असावा असाही अंदाज आहे. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादवराजा सिंघण याच्या नावावरुन स्थापन केलेल्या मंदिराचा असावा. जत तालुक्‍यात सिंघणहळ्ळी आणि सिंगणापूर अशी गावांची नांवे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरुनच असावीत. 

ओढ्यांच्या संगमावर 
कुडनूर हे गाव दोन ओढयांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोडया अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ सिंगणापूरलगत संबंधीत तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडनूर गावाच्या हद्दीत आला असावा, असेही संशोधक कुमठेकर यांनी सांगितले. 
 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT