पश्चिम महाराष्ट्र

(VIDEO) साक्षात यमराजाने केला या महापालिकेचा निषेध

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : रविवारी दुपारची वेळ.. सुटीमुळे प्रत्येकजण आपापल्या कुटुंबियांसह घरांमध्ये रममाण... इतक्यात महापालिकेचा निषेध असो.. या मतदारसंघाच्या
आमदारांचा निषेध असो.. अशा घोषणा एेकायला येऊ लागल्या. उत्सुकतेने अनेकजण बाहेर आले, पाहतात तर काय प्रत्यक्ष यमराज या घोषणा देत होते.
सोबतीला होते जुळे सोलापूर परिसरातील नागरीक आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते. 

खराब रस्त्यामुळे भोगाव्या लागतात नरकयातना  
जुळे सोलापुरातील चाणक्य नगर येथील अत्यंत खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे अनेक नागरिकांना नरक यातना सहन करावी लागत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या रस्त्याच्या डांबरीकरणच्या मागणीसाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी यमराजाच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापूर भागाचा विस्तार  झपाट्याने हो असताना नगरी लोकवस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत  आहे हद्दवाढ होऊन 27 वर्षाचा काळ लोटला. तरी नागरिकांना रस्त्याची आणि ड्रेनेज लाईन ची सुविधा 
अद्याप मिळाली नाही .

पाच दिवसाआड पाणी अवेळी सोडले जाते 
ड्रेनेजचे काम अर्धवट असल्याने ड्रेनेज लाईन ची जोडणी करण्यात आली नाही त्यामुळे कच्चे रस्ते खूपच खराब झाले आहेत. अंतर्गत रस्त्यात खूप खड्डे पडल्याने जेष्ठ नागरिकांना पाठ व कंबरदुखीचा त्रास होत असून विद्यार्थ्यांना व महिलाना 
शाळेत जाताना व सोडवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही विद्यार्थी व महिला या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत त्यामुळे हे आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.

यांनी घेतला आंदोलनात सहभाग
संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, उपाध्यक्ष श्रीमंत पात्रे, सचिव गोविंद चव्हाण, नितीन होनमाने,  गणेश गरगडे, सचिन शिरसागर,
नवनाथ देडे, चेतन चौधरी, कपिल आलाट, सचिन  पंगुडवाले,  संजय भोसले, आशितोष माने, शुभम भिसे, संतोष माशाळकर, मनोज भालेराव, गणेश माळवदे, इलियास शेख, संतोष  वानकर, दिगंबर कदम,वैयजंती कदम, तुलसी कदम, संतोष धुळे, विजय बिल्लेगुरु, अमोल भालेकर, माधुरी कुलकर्णी, लक्ष्मण इंडी.

 आता पहा यमराजाचे आंदोलन (VIDEO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT