yashomati thakur criticised on governor bhagat singh koshyari in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

'राज्याच्या घटनात्मक राज्यपाल पदावर योग्य माणूस बसलेला नाही' ; यशोमती ठाकूर यांची घणाघाती टीका

सकाळ वृत्तसेवा

जत (सांगली) : राज्यातील कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीवरून राज्यपाल मुख्यमंत्र्यांना उलट प्रश्न विचारतात. देशाच्या घटनात्मक पदाचा आम्ही आदर करतो. मात्र, राज्याच्या घटनात्मक राज्यपाल पदावर योग्य माणूस बसला नाही. त्यामुळे जतला कृषी महाविद्यालय होत नाही. असे खळबळजनक वक्तव्य महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

जतमध्ये ‘माळरान कृषी, पशुप्रदर्शन व कृषी सन्मान’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री ठाकूर यांनी थेट राज्याच्या राज्यपाल यांनाच टीकेचे लक्ष केले. राज्यपाल कामांना आडकाठी आणण्याचे काम करतात, असा आरोप श्रीमती ठाकूर यांनी केला. दरम्यान, ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT