Yashwant Sinha says the country will be divided again marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

...तर पुन्हा देशाचे विभाजन अटळ : यशवंत सिन्हा

आनंद गायकवाड

संगमनेर : ""सदैव खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारचे पितळ उघडे पडले आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आहे. या महत्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. या काळ्या कायद्यामुळे देशात असंतोष निर्माण झाला. देशवासीयांनी या कायद्याचा विरोध, तसेच संविधानाचे रक्षण न केल्यास देशाचे पुन्हा एकदा विभाजन होईल,'' अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. 

सिन्हा यांनी काढलेल्या मुंबई ते दिल्ली गांधी शांती यात्रेचे शुक्रवारी (ता.10) संगमनेर येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. 
सिन्हा म्हणाले, ""या काळ्या कायद्याविरोधात समविचारी पक्ष व जनता रस्त्यावर आली. सुशिक्षीत विद्यार्थ्यांचे विचार दाबण्यासाठी केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर गुंडांच्या टोळ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात धुडगुस घातला.'' 

देशाची अर्थव्यवस्था रसातळाला

पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशात 31 डिसेंबर 2014 पर्यंतच अत्याचार झाले का, जगातील इतर 54 देशांत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीत का, असा सवाल करून सिन्हा म्हणाले, ""देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. एक टक्का "जीडीपी' घसरल्यास देशाची 2 लाख कोटी रुपयांची हानी होते. संसदेने मंजूर केलेला हा कायदा संसदेतच बरखास्त करावा, नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करण्यासाठी ही शांती यात्रा काढली आहे.'' 

धर्म व राजकारणाची गफलत नको

चव्हाण म्हणाले, ""जातीयवादी विष पेरणाऱ्या पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. देशाचे सार्वभौमत्व व सर्वधर्म समभावाला मूठमाती देणाऱ्या या कायद्याचे खोटे फायदे सांगण्यासाठी भाजपचे अनेक प्रचारक सक्रीय झाले आहेत. मात्र, या कायद्याचे दूरगामी परिणाम सर्वांवर होणार आहेत. धर्म व राजकारणाची गफलत होता कामा नये. आज मुस्लिमांना, तर उद्या इतर धर्मियांनाही वगळण्यात येईल.

मोदी सरकारची हुकूमशाही मोडून काढा

''22 जानेवारीला या कायद्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्थिक स्थिती कोलमडली असूनही, गोंडस आकडे फुगवून सांगितले जात आहेत. मंदी, बेरोजगारी वाढली आहे. अर्थमंत्र्यांना बैठकीला न बोलाविता, पंतप्रधानांनी 13 बैठका घेतल्या. या सर्व परिस्थितीबाबत युवकांनी जागरुक होऊन मोदी सरकारची हुकूमशाही मोडून काढावी,'' असे आवाहन चव्हाण यांनी केले

आमदार आशिष देशमुख, आमदार डॉ. सुधीर तांबे, विनायक देशमुख, दुर्गा तांबे, आबासाहेब थोरात, बाबा ओहोळ, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, ऍड. नीशा शिवूरकर, राजाभाऊ अवसक, सुनंदा जोर्वेकर आदी उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT