Yashwantraoji's museum set up by teachers in Devrashtra 
पश्चिम महाराष्ट्र

देवराष्ट्रेत शिक्षकांनी साकारले यशवंतरावजींचे संग्रहालय 

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे बालपण ज्या आजोळी घडले त्या देवराष्ट्रे गावात त्यांनीच स्थापन केलेल्या शाळेत आता त्यांचे कायमस्वरुपी छायाचित्र संग्रहालय सुरु झाले आहे. यशवंतरावांचा जीवनपट मांडणारे हे संग्रहालय पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना संकटावर मात करीत पुढे जायचंच हा निर्धार देत आहे. 

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी राज्याच्या कृषी-औद्योगिक विकासाच्या धोरणाचा पाया घातला. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातील तरुणांना त्यांनी उद्योजक केले. शिक्षणसंस्थाचालक केले. आयुष्यभर सत्तेत असूनही उपभोगशुन्य स्वामी राहिलेल्या चव्हाणसाहेबांनी स्वतःची म्हणून एकच शाळा काढली ती आपल्या आजोळी. ज्या गावाने आपल्याला घडवले त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून. 1961 मध्ये स्थापन झालेली ही शाळा मुलांना लढण्याची प्रेरणा देत आहे. आता ही शाळा यशवंत शिक्षण संस्थेची यशवंतराव हायस्कुल म्हणून ओळखली जाते. साहेबांचा परिसस्पर्ष लाभलेल्या या शाळेतील शिक्षकांनी सतत उपक्रम राबवत साहेबांना नाव सार्थ ठरवले आहे. 

या हायस्कुलच्या प्रवेशद्वाराजवळील सभागृहात साहेबांचे जीवनचित्रदर्शन घडवणारे संग्रहालय साकारले आहे. साहेबांच्या मातोश्री विठाबाईं वडील वडील बळवंतराव, त्यांच्या भगिणी, बंधू यांच्या आप्तांची छायाचित्रे आहेत. त्यांच्या राजकीय जीवनपट उभा करणारी ही छायाचित्रे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या उभारणीचा पटच मांडतात. पार्लमेंटरी सेक्रेटरी ,मुख्यमंत्री, उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. अशा सुमारे चारशे छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. 

यामागे मुख्याध्यापक के. एच. पवार ,पी .ए. पवार,आर. एस. माळी, शरद शिंदे, अमोल बंडगे, सुरेश शेळकंडे, निलेश केंगले आदी शिक्षकांचे योगदान आहे. हे प्रदर्शन साकारण्यासाठी सुमारे महिनाभर सर्व शिक्षक परिश्रम घेत होते. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी नुकतेच या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. शिक्षकांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. चव्हाणसाहेबांचे सर्वव्यापी कार्याचा महाराष्ट्र ऋणी आहे. इथून मुले "यशवंतराव' होण्याची प्रेरणा घेतील असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT