for year ending occasion of 31 ambulance employee holiday cancel in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

यंदा वर्षअखेरला रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. या काळात रस्ते अपघात घडण्याची संख्या अधिक असते. त्यातून काहींना जीव गमवावा लागतो तर काही जण जायबंदी झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून ३१ डिसेंबर ते १ जानेवारी यादरम्यान १०८ रुग्णवाहिकेवर सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात एकूण ५६ रुग्णवाहिका असून २४० कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण सुटी काढून थर्टी फर्स्टनिमित्त मौजमजा करतात; परंतु १०८ रुग्णवाहिकेवरील कर्मचारी मात्र  दोन दिवस २४ तास सेवेवर कार्यरत असतात. जिल्ह्यात दररोज किमान चार-पाच रस्ते अपघात घडल्याचे पाहावयास मिळते. अशा वेळी आपत्कालीन सेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

थर्टीफर्स्ट निमित्त १०८ रुग्णवाहिकेवरील कर्मचारी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत. थर्टीफर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत मौजमजा करुन मद्याच्या अंमलात घरी जात असताना रस्ते अपघात घडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही तातडीने सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका कार्यरत राहणार आहेत.

जिल्ह्यात एकूण ५६ रुग्णवाहिका तर एक बाईक रुग्णवाहिका कार्यरत आहे. त्यापैकी शहरासाठी पाच १०८ रुग्णवाहिका आणि एक बाईक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १२० कर्मचारी आणि १२० चालक असे एकूण २४० जण रात्रंदिवस सेवा बजावणार आहेत. शहरातील रुग्णवाहिका काकती, चन्नम्मा सर्कल, मच्छे, सांबरा आणि बागेवाडी येथे सज्ज राहणार आहेत.

"थर्टीफर्स्टच्या काळात रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याची सूचना मुख्य कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या सुट्या रद्द करून कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. शहरासाठी पाच तर जिल्ह्यासाठी ५१ रुग्णवाहिका सज्ज असणार आहेत."

- प्रताप शेट्टी, व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका, बेळगाव

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT