पश्चिम महाराष्ट्र

चालु वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ तालुक्यात चालु वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस पडल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील जळालेली पिके, हुमणीमुळे बाधीत झालेले, ऊसाचे क्षेत्र आदीच्या उपाययोजना व चर्चा करण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाची दुष्काळ आढावा बैठक शुक्रवारी तहसील कार्यालयात संपन्न झाली.

तालुक्यात चालु पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जामिनीतील ओल संपली आहे. भविष्यात पाऊस पडेल या आशेवर व निसर्गावर भरोसा ठेवुन शेतकऱ्यांनी आहे, तेवढया ओलीवर पेरणी केली. पेरले ले उगवुनही आले. मात्र पावसाने पुन्हा ओढ दिल्याने ते ही जळुन गेले. तालुक्यातील ऊसाला कधी नाही ऐवढा हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. या बाबत वृतपत्रांनी आवाज उठविल्यावर, शासनाने त्याची दखल घेऊन 24 सप्टेबर पासून बाधीत ऊस क्षेत्राचे पंचनामे सुरु केले. त्यासाठी 187 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे. मात्र ती संख्या अपुरी असल्याने पंचनाम्यास उशीर लागत आहे .

पिक पाहणीसाठी सरासरीच्या निकषावर दहा गावांची निवड केली आहे, त्यात सारोळे, आढेगाव, कोन्हेरी, शेटफळ, वडाचीवाडी, कोंबडवाडी, मसले चौधरी, देगाव, वाळुज, व जामगाव बु॥ यांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक एकाच प्रमुख पिकाचे पाच शेतकरी निवडुन, त्यांच्या पिक पाहणीचा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सुचना तहसीलदार बनसोडे यांनी दिल्या. यावेळी महसुल नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर, कृषी अधिकारी श्रीधर जोशी, यांच्यासह सर्व तलाठी ग्रामसेवक व कृषी साहाय्यक उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT