This year's grape season is late in Tasgaon taluka
This year's grape season is late in Tasgaon taluka 
पश्चिम महाराष्ट्र

तासगाव तालुक्‍यात यंदाचा द्राक्ष हंगाम उशिरा

रवींद्र माने

येळावी : यंदाचा मान्सून व वादळी पाऊस धुवांधार व संततधार राहिल्याने सध्या तासगाव पश्‍चिम भागातील निमणी, तुरची, येळावी परिसरातील द्राक्षबागांच्या लांबलेल्या द्राक्ष फळ छाटण्या या एकाच कालावधीत व एकाचवेळी होऊ लागल्या आहेत. परिणामी यंदाचा या परिसरातील सर्व द्राक्षबागांचा द्राक्ष हंगाम उशिरा व एकाचवेळी सुरू होणार असल्याने द्राक्ष दर कमी मिळण्याचे संकट बागायतदारासमोर उभे राहणार आहे. 

अनेक बागांची छाटणी एकाचवेळी सुरु झाल्याने मजुरांची कमतरताही भासू लागल्याचे चित्र दिसून येते. तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. निमणी, तुरची, नेहरूनगर, नागाव, व येळावी या परिसरातील द्राक्ष बागायतदार द्राक्ष दर चांगला मिळावा म्हणून नेहमी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात आगाप फळ छाटणी घेतात.

मात्र यंदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच सततधार, मुसळधार पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. या काळात द्राक्ष बागेत पाणी साचून राहिल्याने द्राक्ष वेलीच्या मुळांची वाढ खुंटली. परिणामी अशा वातावरणात डोळे न फुटण्याच्या भीतीमुळे अनेक द्राक्षबागायतदारांनी आगाप फळछाटणी घेण्याचे धाडस केले नव्हते. परंतु गेल्या पंधरा दिवसात पावसाने उघडीप दिल्याने या परिसरातील फळ छाटणी कामाना चांगलाच वेग आला आहे. 

कामासाठी मजुर दाखल 
अनेक बागांची द्राक्ष छाटण्या एकाच कालावधीत झाल्याने अनेक बागांचाही द्राक्ष हंगामही एकाच वेळी येणार असल्याने द्राक्ष दर घसरण्याचे संकट भविष्यात उभे राहणार आहे.सध्या या परिसरात एकाच वेळी अनेक द्राक्ष बागांची छाटणी होत असल्याने गावातील मजूरबरोबर तासगाव निमणी,तुरची परिसरातील अनेक मजूर गट या कामासाठी येत असल्याचे दिसून येते. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT