Yerla River dry; Nimbalak, Morale dams also dried up: Farmers worried 
पश्चिम महाराष्ट्र

येरळा नदी कोरडी; निंबळक, मोराळे बंधारेही पडले कोरडे : शेतकरी हवालदिल

दिग्विजय साळुंखे

बोरंगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्‍यातून पूर्व भागातून वाहणारी व शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या येरळा पात्र व बंधारे एक महिन्यापासून कोरडे पडले आहेत. परिणामी नदीकाठावरील सुमारे चारशे हेक्‍टर क्षेत्रावरील पिके वाळून जात आहे. आरफळ, ताकारी योजनेचे पाणी नदी पात्रात सोडावे, अशी मागणी नदीकाठावरील शेतकरी करत आहेत. 


येरळा नदीकाठावरील वाझर, आंधळी, निंबळक, मोराळे, राजापूर, बोरगाव, तुरची या गावांतील द्राक्ष बाग, ऊस भाजीपाला आदी पिके पाण्यावाचून वाळून जाण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्त करत आहेत. मागील वर्षी अनंत अडचणीला सामना करणारे शेतकरी आता नदीत पाणीच नसल्याच्या संकटाने हवालदिल झाले आहेत.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मागील 7 ते 8 दिवसांपासून या भागात सूर्य आगच ओकतोय. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. तापमाण सुद्धा दररोज वाढतच आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोतही झपाट्याने खालावत चालले आहेत. 


शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात नदीत जॅकवेल खोदली आहेत. दोन कि. मी. पर्यंत पाईपलाईन पाणी पोहोचले आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या बागांची खरड छाटणीला लवकरच सुरवात होणार आहे. खोडवा ऊस पीक, सुरुच्या ऊस लागणी मोठ्या प्रमाणात या भागात झाल्या आहेत.

या पिकांना पाणी न मिळाल्यास पिके वाळून जातील. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा संभव आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ताकारी, आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीपात्रात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT