पश्चिम महाराष्ट्र

गोडोलीतील रस्त्यावरील हटेना पाणी ! बांधकाम विभागाचे 13 लाख पाण्यात

सकाळ वृत्तसेवा

गोडोली ः येथील शिवनेरी ते माधुरी कॉलनी दरम्यान असलेल्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गेले दोन महिने गुडगाभर पाणी हटले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने 13 लाख खर्च करूनही रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे. ओढ्यावर साकव पूल बांधला, तरी मूळ रस्त्यावर साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. म्हणजे बांधकाम विभागाचे नियोजन फसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सातारा शहराच्या दक्षिणेला गोळीबार मैदान डोंगरापर्यंत नैसर्गिक जागा विस्तारासाठी असल्यामुळे अजिंक्‍यातारा पायथा ते खिंडीपर्यंत अनेक गृहनिर्माण सोसायट्या व वैयक्तिक सदनिका बांधल्या गेल्या आहेत. त्यात कोणताच आराखडा बांधकामाच्या दृष्टीने शास्त्रीय पद्धतीने अंमलात आणला गेलेला नाही. त्यामुळे रस्ता, गटारे, वीज, पाणी, स्वच्छतागृह, सार्वजनिक मोकळी जागा यांचा फारसा विचार न करता व अजिंक्‍यताऱ्याच्या येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला अरुंद करून नाले, ओढ बंद करून बांधकामे केली.

सध्या आगटे, गिरजे यांच्या अपार्टमेंटपासून जगतापवाडीपर्यंतचा रस्ता अत्यंत अडचणीचा झाला आहे, तर शिवनेरी ते माधुरी कॉलनी व परिसरात गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पाणी साठून राहिल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. साथीचे आजार बळावत आहेत. वाहनचालकांचे धाडस अपघाताला निमंत्रण देत आहे. या भागात संपर्कासाठी पूर्वेकडे व पश्‍चिमेकडे दोन अनधिकृत रस्ते असले, तरी त्याचीही स्थिती खराब आहे. त्यामुळे साकव पुलावरूनच ये- जा करावी लागत आहे. पुढील काळात तरी सध्याचे साठलेले पाण्याचा कायमचा निचरा होण्यासाठी नेमका आराखडा कार्यान्वित करावा. सध्या तात्पुरत्या स्वरूपात पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग शोधणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी गांभीर्यांने ही बाब लक्षात घेणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे मत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गेल्यावेळी मुंबईत धिंगणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT