You have to handwash here when you come to Miraj city 
पश्चिम महाराष्ट्र

या शहरात येताना इथे हँडवॉश करावे लागणार

शंकर भोसले

मिरज : कोरोना रोगाला पराभूत करण्यासाठी महापालिकेकडून कसोशीने प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. यासाठी येथील मिशन चौकात हॅण्डवॉश स्टेशन उभे करण्यापासून ते येथील उपनगरांमध्ये औषधे, धूर फवारणी, रस्ते चका चक करणे, घंटागाडींवर प्रबोधनात्मक गीत वाजवण्यापर्यंत अनेक उपाययोजना सुरू आहेत. यापुढे शहरात प्रवेश करायचा झाल्यास मिशन चौकात हात धुवूनच शहरात प्रवेश करावा लागणार आहे. कोरोना लढ्याठी पोलिस प्रशासनासह सर्वच शासकीय यंत्रणा आहोरात्र झटताना दिसत आहे. यामध्ये महापालिका देखिल काही मागे नाही.

महापालिकेकडून शहरात उत्तम प्रकारे साफसफाई सुरू आहे. दिवसाआड प्रत्येक उपनगरात औषध फवारणी, धूर फवारणी केली जात आहे. शिवाय आरोग्य विभागाकडून नामी शक्कल लढवित घंटा गाडीवरील कचरा उठावाचे गीत बदलून ती कोरोनाविषयी जनजागृती देणारे नवे गीत वाजविण्यात येत आहे. यामुळे सकाळी घंटा गाडी दारात आल्यावर नागरिकांना कोरोनाविषयी कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे याची इत्यंभूत माहिती मिळते आहे. शिवाय यातूनच नागरिकांनी देखील विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील केले जात आहे. 

तसेच शहरातील निवारा केंद्रामध्ये दोनशे पन्नास निराधार लोकांची सोय करण्यात आली आहे. त्यांना पोटभर अन्न देण्यासाठी सेवा भावी संस्थांची मदत घेतली जात आहे. शिवाय डॉ. विनोद परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टकडून त्यांनी नियमित आरोग्य तपासणी सुरू आहे, तर निराधारांचे मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून त्यांचे प्रबोधन केले जात आहे. सध्या महापालिकेडून घराबाहेर पडता न येणाऱ्या नागरिकांना मोबाईल आरोग्य व्हॅन सुरू करण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. 

घराबाहेर पडणे टाळा

नागरिकांनी घरातील वस्तू जपून वापराव्यात. उगाच वस्तूंसाठी घराबाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या. महापालिका नक्कीच तुम्ही सुरक्षित राहण्साठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आम्हाला तुमची साथ गरजेची आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन घराबाहेर पडणे टाळावे. यामुळे पोलिस प्रशासन आणि महापालिकेला काम करण्यास मदत होईल. 
- स्मृती पाटील, उपायुक्त मिरज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT