IS320A04306 
पश्चिम महाराष्ट्र

गर्भवतीने सूर्यग्रहणात केलं असं काही की थक्क व्हाल ! 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यान पिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारिरीक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून धाडसी कृती करत तरुणीने वेगळा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला. 

समृद्धी जाधव म्हणाल्या,"आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे व माझ्या कुटुंबाची जागृती केली. आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली. सासूबाई श्रीमती सिंधुताई जाधव, चंदन जाधव, दीपक जाधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला.' 
विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला करायला नको का? असा प्रश्न ही यावेळी समृद्धीने केला. इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल म्हणाल्या, ""अंनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे. ग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण झालेली असते. गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते नाही. हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल.'' 


प्रा. शामराव पाटील म्हणाले, "अंनिस नेहमीच कृतिशील पाऊल टाकत असते.ग्रहणाबाबत हे प्रबोधन लोकांच्यात मोठी जनजागृती करेल." संजय बनसोडे म्हणाले, "खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो. सूर्यग्रहणाबाबत आजचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडणाऱ्या युवतीचे कौतुक करावे इतके थोडे आहे." 


प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी इस्लामपुरातून सूर्यग्रहणाचे फेसबुकवरून थेट प्रसारण करीत प्रबोधन केले आणि शास्त्रीय माहिती दिली. आपल्याकडे ग्रहण खंडग्रास पद्धतीने दिसते. ग्रहणाचा सुंदर नजराणा लोकांनी पाहिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT