Confession of a lover killed a loved one 
पश्चिम महाराष्ट्र

मला शोधताय ः मीच मारलंय तिला, प्रियकराचा कबूलनामा

सकाळ वृत्तसेवा

राहुरी: राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजता निर्जनस्थळी एकाने तीस वर्षांच्या महिलेवर धारदार शस्त्राने वार केले. महिलेला रक्ताच्या थारोळ्यात सोडून हल्लेखोर पसार झाला. जखमी अवस्थेत नगर-मनमाड रस्त्यावर येऊन महिलेने प्रवाशांकडे मदत मागितली. परिसरातील ग्रामस्थांनी कळविल्यावर राहुरी पोलिसांनी तेथे जाऊन तिला नगरमधील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हल्लेखोर काल रात्री उशिरा स्वतःहून राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. 

तिच्यासमवेत आला होता फिरायला
असिफ कबीर पठाण (वय 30, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर), असे आरोपीचे नाव आहे. तो काल एका महिलेसमवेत मुळा धरण परिसरात फिरायला आला होता. सायंकाळी सहा वाजता दोघेही कृषी विद्यापीठाच्या मेंढी प्रकल्पाजवळ निर्जनस्थळी बसले होते. तेथे दोघांचे भांडण झाले. त्यातून आरोपी पठाणने धारदार चाकूने महिलेच्या गळ्यावर, हातावर व कानावर सहा वार केले.

वार करून पळाला

महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला तसेच सोडून तो पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत महिला चालत नगर-मनमाड रस्त्यावर आली. रस्त्यावरील प्रवाशांकडे तिने मदत मागितली. लोकांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस पथक पाठवून जखमी महिलेला दवाखान्यात हलविले. 

स्वतःहून हजर
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. काल रात्री उशिरा आरोपी पठाण स्वतःहून राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जखमी महिलेवर नगर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. 
आरोपी पठाण विमा सल्लागार असून, जखमी महिला एका रुग्णालयात काम करते. दोघेही श्रीरामपूर तालुक्‍यातील असून, प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Satara Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; वनधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा

16 तास उपवास, रोज 6 KM चालणं; 61 व्या वर्षी निवेदिता 'असा' आहे सराफ फिटनेस मंत्रा? म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT