Savlaj Sangli Tasgaon Police
Savlaj Sangli Tasgaon Police esakal
पश्चिम महाराष्ट्र

बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; मेहुण्याला घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

संशयित ओंकार सध्या सासूरवाडी इचलकरंजी येथे राहत आहे. त्याला इचलकरंजी येथून ताब्यात घेण्यात आले.

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे बहिणीशी प्रेमविवाह (love Marriage) केल्याच्या रागातून तरुणाचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. भारत ऊर्फ संतोष संजय पाटील (वय २९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने सावळज (Savlaj Sangli) परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, तासगाव पोलिसांनी (Tasgaon Police) संशयावरून रात्री उशिरा संतोषचा मेहुणा ओंकार पाटीलला इचलकरंजी येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत तासगाव पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सावळज (ता. तासगाव) येथील ट्रॅक्टर चालक संतोष पाटील याने २०२१ मध्ये भावकीतीलच ओंकार शिवाजी पाटील याच्या बहिणीशी प्रेमविवाह केला. त्याचा राग मनात धरून ओंकार संतोषला नेहमी शिवीगाळ करीत असे. अनेकदा ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीही देत असे.

काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वस्तीपासून काही अंतरावर संजय पवार यांच्या शेततळ्याजवळ संतोषचा डोक्यात मागून धारदार शस्त्राने वार करून खून झाला. खून ओंकार शिवाजी पाटील याने केल्याचा संशय असल्याची फिर्याद मृत संतोषची आई वैशाली संजय पाटील यांनी पोलिसांत दिली. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

आज दिवसभर पोलिस अधिकारी व पथक सावळज येथे उशिरापर्यंत तळ ठोकून होते. मृत संतोष पाटील ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत असे. ऑगस्ट २०२१ मध्ये त्याने प्रेमविवाह केला. दाम्पत्याला एक मुलगाही आहे. काल सायंकाळी कामावरून येऊन साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी रात्री ९.३० वाजेपर्यंत येतो, असे सांगून मोटारसायकलवरून गेला. घटनास्थळी त्याची मोटारसायकल पडली होती. संशयित ओंकार सध्या सासूरवाडी इचलकरंजी येथे राहत आहे. त्याला इचलकरंजी येथून ताब्यात घेण्यात आले. सहाय्‍यक पोलिस निरीक्षक भांडवलकर अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT