Youth fraud for marriage 
पश्चिम महाराष्ट्र

तुम्हाला लग्न करायचंय... मग या बाईपासून सावध! लग्न करते अन वरून...

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः बनावट नवरी उभी करून विवाह लावून लाखो रुपयांना गंडा घालणारे रॅकेट शहरात उघडकीस आले आहे. अशा प्रकारे खोटा विवाह लावून येथील तरुण व्यापाऱ्याची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बेलापूर रस्त्यावरील आशीर्वादनगरमध्ये राहणाऱ्या सुमीत कैलास पांडे (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल रजपूत ऊर्फ कल्याण फकीरराव राऊत, नीता (पूर्ण नाव समजले नाही, रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद) व मेधा संजय कटारिया व अश्विनी कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 
जनरल स्टोअर असलेल्या सुमीत पांडे यांची औरंगाबाद येथील लग्न जमविणाऱ्या राहुल रजपूत ऊर्फ कल्याण राऊत याच्याशी चार महिन्यांपूर्वी भेट झाली. "जैन समाजातील एका मुलीचे आई-वडील लहानपणीच मृत पावले आहेत. काकांनी तिचा सांभाळ केला आहे. तिचा विवाह करायचा आहे,' असे राऊतने सांगितले. त्यानंतर या रॅकेटमधील एकाने पांडे यांच्याशी बोलणी केली.

19 जानेवारी रोजी मुलीसह चौघे शहरात आले. त्यांनी पांडे व त्यांच्या नातेवाइकांशी बोलणी केली. त्याच दिवशी केशव गोविंद बनात साध्या पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यासाठी या चौघांनी सव्वादोन लाखांची रक्कम घेतली. तसेच नवरीच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने घालण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर नवरीला घेऊन ते औरंगाबादला गेले. नंतर नवरी नांदायला आलीच नाही. 
पांडे यांनी संपर्क करूनही उपयोग झाला नाही. अखेर ते नातेवाइकांसह औरंगाबाद येथे रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील राऊतच्या घरी गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नवरीच्या मैत्रिणीची आई वारली, असा बहाणा केला. नंतर मात्र त्यांनी तुमचा विवाहच झालेला नाही, असा पवित्रा घेतला.

विवाह लावणाऱ्या या रॅकेटने पांडे यांना सुमारे पावणेचार लाख रुपयांना गंडा घातला. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या रॅकेटमधील आरोपींची नावेही बनावट असून, नवरीदेखील बनावट असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT