youth marriage problem story by sadanand pukale 
पश्चिम महाराष्ट्र

सगळं आहे ! फक्त पोरगी मिळाली पाहिजे ; व्यथा तिशी ओलांडलेल्या मुलांची

सदाशिव पुकळे

झरे (सांगली) : ग्रामीण भागामध्ये सध्या लग्नसराई धूमधडाक्‍यात सुरू आहे. अनेक तरुणांना नोकरी नसल्याने विवाह जुळवणे अवघड झाले आहे. तरुणांनी शिक्षणाच्या जोरावर पदव्या बहाल केल्या. मात्र बेकारी वाढल्याने पाहिजे, अशी नोकरी मिळेना, त्यामुळे छोकरी पण मिळेना. अशी अवस्था तरुणांची झाली आहे. मुलांच्या बरोबरीने मुली सुद्धा शिक्षण, नोकरी क्षेत्रामध्ये मागे नाहीत. मुलींसुद्धा शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचल्या आहेत. व अनेक ठिकाणी नोकरी करीत आहेत. त्यामुळे मुलीसुद्धा आपल्या सारखाच नोकरी करणारा मुलगा शोधत आहेत.


अलिकडच्या काळात मुली उच्चपदावर आहेत. तर अनेक मुलींनी वेगवेगळे कोर्स केले असल्याने नोकरी करीत आहेत. त्यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना त्यांच्याच सारखा नोकरी करणारा  मुलगा हवा आहे. या पसंतीत मुला मुलींनी तिशी ओलंडलेले बघायला मिळत आहे.

सध्याच्या काळामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा वेगवेगळे प्रकारचे कोर्स करून सुद्धा किंवा उच्चशिक्षित शिक्षण घेऊन सुद्धा अनेक तरुणांना नोकरी मिळेना. नोकरी मिळत नसल्याने छोकरी मिळेना, अशी अवस्था झाली आहे. अनेक तरुणांनी तिशी ओलांडली असून तरीसुद्धा लग्नाच्या रेशीमगाठी जुळून येत नाहीत.त्यामुळे लग्न जुळवणे ही एक डोकेदुखी होऊन बसली आहे. लग्नसराईच्या तारखा संपत आल्या तरी सुद्धा लग्ने जुळून येत नाहीत.नोकरी नाही, कामधंदा काही नाही, उच्चशिक्षित असून नोकरी मिळेना अशा अनेक कारणाने लग्न जुळवणे ही तारेवरची कसरत झाली आहे.

शेतकऱ्याच्या पोरांची हालत बेकार
लग्नासाठी प्रत्येक मुलगी नोकरीवाला नवरदेव पाहिजे, अशी अपेक्षा बाळगते, मग शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देणार तरी कोण ? हा गंभीर प्रश्न मुलांच्या आई-वडिलांसमोर उभा आहे. मुलगा शेती करतोय म्हटल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांच्या अगोदरच मुलीचा नकार असतो. मग शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न जमणार तरी कसे ? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT