Youth Murder Incidence On Shiroli Bridge Kolhapur Marathi News
Youth Murder Incidence On Shiroli Bridge Kolhapur Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

मोबाईलमध्ये काय बघतोस यावरून झाला वाद अन् ...

सकाळ वृत्तसेवा

नागाव ( कोल्हापूर ) - हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे . गणेश नामदेव लोहार ( वय, अंदाजे २६, रा. पुलाची शिरोली ) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरा झालेली ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

अवघ्या चार तासात आरोपींना पकडण्यात यश आले आहे. शंभुराज माणिक पाटील ( १९, कामत काॅलनी, आझाद चौक, यादव वाडी, पुलाची शिरोली ), दिग्विजय कृष्णात पाटील ( १९, सर्जेखान गल्ली, पुलाची शिरोली ) व एक अल्पवयीन मुलगा अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली फाटा येथील महात वे ब्रीजशेजारी ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना पकडले आहे. 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी :

अनोळखी व्यक्तीने फोनवरुन शिरोली फाटा येथील महात वे ब्रीज जवळ एका व्यक्तीचा मृत्यू  झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली.  घटनास्थळी पोहचताच पोलिसांना हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता. आणि शेजारीच त्याच्या डोक्यात घातलेले तीन मोठे दगडही होते. महामार्गालगतची घटना असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली. गणेशचे वडिल, चुलते व अन्य नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

वडिलांचा आक्राेश

गणेश हा प्लम्बिंगचे  काम करत असे. पण तब्येत ठीक नसल्याने तो कामावर जात नव्हता. काल संध्याकाळी तो घरातून बाहेर पडला होता. सकाळी त्याचा खून झाल्याची बातमीच घरी पोहचली. घटनास्थळी त्या वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला. 

तपासानंतर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 

सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला सुरू झाला. गणेशची मोटारसायकल शेजारी असणाऱ्या बारच्या दारात आढळली. बारच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून गणेश रात्री साडेदहा वाजता बारमधून बाहेर पडला. त्याचवेळी तिघे आरोपीही बारमधून बाहेर पडले. बाहेरच्या कट्ट्यावर गणेश मोबाईल बघत बसला. मोबाईल मध्ये काय बघतोस, असे म्हणत अल्पवयीन मुलाने हातातील मोबाईल बघण्यासाठी घेतला. त्यामुळे गणेशला राग आला. रागाचे रुपांतर मारामारीत झाले. बारच्या दारात दंगा करू नका, अशा सूचना बारचालकाने दिल्या. त्यामुळे ते चौघेजण महात वे ब्रीज शेजारी असणाऱ्या सुमो डिझेल पाॅवर या दुकान गाळ्यासमोर गेले. तेथे शंभुराज पाटील याने गणेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. आणि दिग्विजयने गणेशच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये गणेशचा जागीच मृत्यू झाला. दारुच्या नशेत तिघेही निघून गेले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT