पश्चिम महाराष्ट्र

Video : धाडसी युवकांमुळे शिराळ्याच्या पाटलांचा वाचला प्राण

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येथील नविन कृष्णा पुलावरून एकाने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन केला. मात्र त्याला दोघांनी उडी टाकून वाचविले. संदीप आनंदराव पाटील (वय 40, रा. शिराळा) असे वाचलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती कराड पाेलिसांनी दिली. 

श्री. पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. त्याबाबत पोलिस ठाण्यात काहीच नोंद नाही. श्री. पाटील यांनी नदीत उडी मारल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ तेथील स्थानिक रहिवासी सागर झावळे आणि बाळू झावळे या दोन युवकांनाही नदीत उडी मारली. लांबपल्ला अंतर पाेहून ते संदीप पर्यंत पाेहचले. दाेघांनी त्यास दाेन्ही बाजूने पकडून हळूहळू पाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी कृष्णा पूलावर जमलेल्या सर्व नागरीकांनी टाळ्या वाजविल्या. दाेन्ही युवकांमुळे संदीप पाटील यांचे प्राण वाचविले. दरम्यान घटनेची नोंद पोलिसांत झालेली नाही. पाटील यांस वाचविताना संबंधित युवकांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अवघ्या काही मिनीटांत माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे घटना खरी की खाेटी याची चर्चाही हाेऊ लागली. अखेर माध्यमांना ही घटना घडल्याचा दुजोरा पोलिसांनी दिला आहे. मात्र त्याबाबतची काहीच ठाेस माहिती उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा पर्यंत नाेंद झालेली नव्हती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Roopali FDA Action : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, 'एफडीए'ची मोठी कारवाई

India Test Squad vs NZ: भारताच्या कसोटी संघात महत्त्वाचा बदल! कुलदीप यादव OUT, वन डे गाजवणारा गोलंदाज IN; पण, नेमकं काय घडलं?

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी लोकलचा जम्बो ब्लॉक; मध्य, हार्बरसह ट्रान्सहार्बर सेवेवर परिणाम

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित

कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल; सोनिया गांधींसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट , नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT