Car Bike Accident Near Kini Toll Plaza esakal
पश्चिम महाराष्ट्र

..अन् क्षणात त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा! 'वनरक्षक'ची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या युवकाचा कार अपघातात मृत्यू

शिराळा येथून तो सकाळी दुचाकीवरून (एमएच १०, सीई ६६५७) कोल्हापूर येथे गेला. तेथे परीक्षा देऊन गावाकडे परत निघाला होता.

सकाळ डिजिटल टीम

घुणकी : वनरक्षक पदाची शारीरिक परीक्षा (Forest Guard Exam) देऊन येत असलेल्या दुचाकीस्वारास महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ (Kini Toll Plaza) मोटारीने ठोकरल्याने (Car Accident) दुचाकीस्वार ठार झाला. विकर्णसिंह नंदकुमार मस्कर (वय २४, रा. शिराळा) त्या युवकाचे नाव आहे. ही दुर्घटना रविवारी (ता.२५) घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बत्तीस शिराळा (Battis Shirala) येथील विकर्णसिंह मस्कर या युवकाने परिस्थितीवर मात करत बीएस्सी (B.Sc) पदवी संपादन केली. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याच्या जिद्दीने अथक परिश्रम करत विकर्ण याने अभ्यास केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या (State Public Service Commission) वतीने घेण्यात आलेल्या वनरक्षक परीक्षेत तो पास झाला. रविवारी सकाळी त्याची कोल्हापूर येथे शारीरिक चाचणी होती.

यासाठी शिराळा येथून तो सकाळी दुचाकीवरून (एमएच १०, सीई ६६५७) कोल्हापूर येथे गेला. तेथे परीक्षा देऊन गावाकडे परत निघाला होता. टोल नाक्याजवळ येताच पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीची (एमएच १३, ईसी ३०६३) विकर्णसिंहच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या धडकेनंतर विकर्णसिंहची बॅग मोटारीच्या आरशाला अडकली आणि तो मोटारसायकलसह महामार्गावर कोसळला.

डोके रस्त्यावर जोराने आपटल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद आज रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलिस ठाण्यात झाली नव्हती. त्याच्या मागे आई, चार बहिणी असा परिवार आहे.

अन् क्षणात त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा!

शिराळा : एक बहीण शिक्षिका अन् दुसरी पोलिस उपनिरीक्षक झाली. चार बहिणीत सर्वात लहान असणारा विकर्णसिंग यानेही त्यापासून प्रेरणा घेतली. स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र त्यालाही खुणावू लागले. ताईप्रमाणे आपण ही शासकीय सेवेत जाण्याचा त्याने चंग बांधला. स्वप्न पूर्तीचा दिवस जवळच आला होता. वन विभागाची शारीरिक चाचणी परीक्षा कोल्हापूर येथे देऊन मोठ्या आनंदाने तो गावाकडे निघाला अन् वाटेतच काळाचा घाला पडला... एका क्षणात त्याच्यासह मस्कर कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला...

ही हृदयद्रावक कहाणी आहे शिराळा येथील सर्वसामान्य मस्कर कुटुंबीयांची. शिराळा येथील विकर्णसिंग नंदकुमार मस्कर (वय २३) याचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. शिराळा येथील फोटोग्राफर नंदकुमार मस्कर यांना चार मुली आणि एक मुलगा. त्यांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. मुलांची जबाबदारी त्यांची पत्नी छायावर आली. चारपैकी मोठी मुलगी निशा शिक्षिका, तर दुसरी उषा पोलिस उपनिरीक्षक झाली. तिसरी मुलगी मृगनयनीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. त्यामुळे मस्कर कुटुंबीयांच्या कष्टप्राय संघर्षावर आनंदाचे दिवस आले होते. चारही मुली विवाहित आहेत.

आता कुटुंबाची जबाबदारी विकर्णसिंगवर आली होती. त्याने बीएस्सीचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात वनरक्षक पदाच्या लेखी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. काल सकाळी शारीरिक चाचणी परीक्षा होती. त्यासाठी कोल्हापूर येथे गेला. परीक्षा देऊन परत येत असताना त्याच्यावर काळाने झडप घालून मस्कर कुटुंबीयांच्या सुखी स्वप्नांचा चुराडा केला. या घटनेमुळे शिराळा व परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT