images (1).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांचा "तो' व्हिडिओ  युवराजसिंग ने केला शेअर

रवींद्र माने

तासगाव ता (सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो हे वारंवार सिद्ध होत असताना, तासगाव पोलिसांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराजसिंग ने फेसबुक शेअर करून पोलिसांमधील माणुसकीला सॅल्युट केला आहे. युवराजसिंग ने शेअर केलेला व्हिडीओ 4. 2लाख लोकांनी पाहिला आहे. तर 11 हजार लोकांनी शेअर केला आहे. 

तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एस के माने आणि त्यांचे 2 गृहरक्षक दलातील सहकारी जाधव आणि फकीर हे कोरोनामुळे पुकारलेल्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर येळावी (ता. तासगाव) येथे बंदोबस्तासाठी तैनात होते. गस्त घालत असताना त्यांना एक वयस्कर व्यक्ती रस्त्याने एकटाच डोक्‍यावर पिशवी घेऊन चालत निघालेली होती. त्याला त्यांनी हटकले कुठून आला? कुठे निघाला ? अशी विचारणा करून रस्त्याच्या कडेला घेतले.

गावोगावी भटकत फिरणाऱ्या त्या व्यक्तीने हिंदीमध्ये चार दिवस पोटात काय नसल्याचे सांगताच , पोलिसांच्यातील माणूस जागा झाला. त्यांनी चटकन आपल्या मोटारसायकल च्या डिकीतील जेवणाचे डबे काढून त्या भुकेल्या माणसाला खाऊ घातले. जेव्हा हा प्रकार घडत होता तेव्हा 

आजूबाजूच्या लोकांना वाटले की आता पोलीस त्या व्यक्तीला बडवणार म्हणून ते व्हिडीओ काढत होते. त्यापैकी कोणीतरी तो व्हिडीओ व्हायरल केला. 
तो व्हिडीओ चक्क क्रिकेटपटू युवराजसिंग पर्यंत पोहोचला."सॅल्यूटिंग द हिरोज" असे म्हणत 4 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर केला. ही घटना (व्हिडीओ) 2.3 लाख लोकांनी पहिला आणि त्यावर 4.2 हजार प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत तर 11 हजार जणांनी हा व्हिडीओ पुढे शेअर केला आहे.

हा व्हिडीओ पहाणाऱ्या सगळ्यांनी त्या पोलिसांचे त्यांच्यातील माणुसकीचे तोंड भरून कौतुक केले आहे. सोशल मीडियाची ताकद किती मोठी आहे याचे हे एक उत्तम उदाहरण मानले पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT