Zilla Parishad school Principal Built protective wall sakal
पश्चिम महाराष्ट्र

सलाम गुरुजी, तुम्हीच! मुख्याध्यापकाने बांधली शाळेची संरक्षक भिंत

शनिवार व रविवारची सुटी सत्कारणी लागावी आणि शाळेच्या विकासात आपला थोडा सक्रिय हातभार रहावा आणि खर्च वाचावा, अशा हेतूने सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ओमासे हे गवंडीच्या भूमिकेत

ज्ञानदेव मासाळ

सांगली : शनिवार व रविवारची सुटी सत्कारणी लागावी आणि शाळेच्या विकासात आपला थोडा सक्रिय हातभार रहावा आणि खर्च वाचावा, अशा हेतूने सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ओमासे हे गवंडीच्या भूमिकेत आहेत. मूळच्या बेडग (ता. मिरज) येथील ओमासे गुरुजींनी तीन दिवसांत तब्बल सहा ब्रासचे बांधकाम करत नऊ हजारांचा खर्च वाचवला. आणि सिद्धेवाडीच्या शाळेच्या विकासात मुख्याध्यापक पदाच्या जबाबदारीसह गवंडी कामाची जबाबदारी लिलया पेलली.

सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद शाळेचा विकास करण्यासाठी शासनासह ग्रामस्थ आणि शिक्षक सरसावले आहेत. मॉडेल्स स्कूल योजनेतर्गंत येथे विविध कामे सुरू आहेत. दरम्यान, लोक वर्गणीतूनही शाळेत कामे सुरू आहेत. याच कामाचा एक भाग म्हणून बाग बगीचांसाठी छोटी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे होते.

ओमासे गुरुजींनी छोट्या बागेसाठी आवश्‍यक संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. दोन फूट उंचीची संरक्षक भिंत त्यांनी उभारली. गुरुजी म्हणतात,‘‘पूर्वी मी गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून केलेल्या कामाचा अनुभव पाठीशी होता. यात मला जमत असलेल्या कामात योगदान द्यावे, या हेतूने मी फुलबागेसाठी आवश्‍यक संरक्षक भिंत बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने सुटी सत्कारणी लागल्याचा मनोमन आनंद आहे.’’

मॉडेल योजनेंतर्गत ना दुरुस्त, पडझड झालेल्या खोल्यांचे बांधकाम, आवश्‍यक ठिकाणी गिलावा, हॅंडवॉश स्टेशन, ग्रंथालय, प्रयोग शाळा, खेळ साहित्य अशा कामांनी शाळा सुसज्ज करावयाची आहे. यासाठी येथे काम सुरू आहे. पाच खोल्यांचा गिलावा, अपंगासाठी शौचालय, खोल्यांची दुरुस्ती, अशी कामे प्रगतिपथावर आहेत. ग्रंथालय, मैदान सपाटीकरण कामे लवकरच पूर्ण होतील. लोकवर्गणीतून ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळ साहित्य खरेदी, बाग-बगीचा, वनौषधी लागवड अशी कामे हाती घेतली आहेत.

त्यासाठी लोकवर्गणीही जमा होत आहे. मुख्य मैदानाच्या अंतर्गत भागात करण्यात येणाऱ्या ग्रामस्थही लोकवर्गणीसाठी सरसावले आहेत. नजीकच्या काळात सर्व कामे पूर्ण होतील, असे श्री. ओमासे म्हणाले. गवंडीच्या भूमिकेत खुद्द गुरुजीच मैदानात उतरल्याने गावकऱ्यांनाही प्रेरणा मिळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT