ncp logo 
पश्चिम महाराष्ट्र

माळशिरसच्या झेडपी सदस्यांची गुरुवारी सुनावणी 

प्रमोद बोडके

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारा विरोधात मतदान केल्या प्रकरणी माळशिरस तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची सुनावणी 9 जानेवारीला दुपारी 1 वाजता ठेवली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माळशिरसचे सदस्य त्रिभुवन धाईंजे व उपाध्यक्ष पदासाठी मोहोळचे जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांना उमेदवारी दिली होती. 
हेही वाचा : राज्यात सर्वाधिक पेन्शन घेणारे आमदार...कोण आहे 
माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे सदस्य स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलादेवी मोहिते-पाटील, गणेश पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांनी राष्ट्रवादीचा आदेश डावलून विरोधात मतदान केले होते. या मतांमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजप व समविचारीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष तर समाधान आवताडे गटाचे दिलीप चव्हाण हे उपाध्यक्ष झाले आहेत. संख्याबळ असतानाही झालेला पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला असून या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रदेश व सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस सरसावली आहे. पराभव झाल्यानंतर उमेदवारांना गटनेते बळिराम साठे यांनी तत्काळ नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. विषय समिती सभापतीच्या निवडीच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी सुरू झाल्याने या प्रकरणात कधी आणि काय निकाल लागतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा : महाराष्ट्रातील नेते म्हणजे भुंकणारी कुत्री 
विषय समितीच्या निवडी 14 जानेवारीला 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी भाजप व समविचारी आघाडीची सत्ता आल्यानंतर विषय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विषय समिती सभापती निवडीसाठी 14 जानेवारीला दुपारी 2 वाजता विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. सभेचे पिठासिन अधिकारी म्हणून महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
व्हिप बद्दल आजही संभ्रम 
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत वेळेत व्हिप काढण्यात सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपयश आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांना व्हिप बजावण्यात आला होता. सभागृहात व्हिप बजावता येतो का? याबद्दल आजही संभ्रम असून या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT