ZP President Election Postponed For Indefinite Time
ZP President Election Postponed For Indefinite Time 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह विषय समिती निवडी आणि पंचायत समितीच्या निवडीचा कार्यक्रम अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. येत्या 21 डिसेंबर रोजी निवडी होतील, असे कालच जाहीर करण्यात आले होते. 

राज्यातील अडीच वर्षांपूर्वी निवडणुका झालेल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षाची मुदत 19 सप्टेंबर रोजी संपणार होती, मात्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने नवे आरक्षण काढण्यात आले नाही. त्यामुळे नव्या निवडींचा कार्यक्रमही झाला नाही. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांची (120 दिवस) मुदतवाढ देत असल्याचा निर्णय 23 ऑगस्ट 2019 रोजी दिला. त्यानुसार 20 डिसेंबर 2019 रोजी हे 120 दिवस संपणार होते. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षाने पदभार घेणे अपेक्षित होते. साहजिकच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यक्रम जाहीर केला होता. 

हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर

हा कार्यक्रम राज्यव्यापी असणार आहे. त्यात नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळे काही अडचणी आल्या. अर्थात, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर चालणार आहे. त्यामुळे सर्वच नेते तेथे व्यस्त असणार आहेत. राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलून गेली आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर तोच राजकीय पॅटर्न राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवता येईल का, याची चाचपणी सुरु आहे. काही ठिकाणी तो यशस्वी झाला असून काही ठिकाणी फसला आहे. यावेळी मात्र तीनही पक्षांनी सावध तयारी सुरु केली आहे. त्यामुळे त्याला पुरेसा वेळ मिळावा, जिल्हा नेतृत्वाला बांधणी करता यावी, असे नियोजन आहे. त्यादृष्टीने 21 रोजी अध्यक्षनिवड होणे गैरसोयीचे ठरले असते, हे स्पष्ट आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी निवडी लांबणीवर टाकल्याने नेत्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT