Rail  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जोरदार पाऊस; नैऋत्य रेल्वे अलर्ट

नाईट पेट्रोलिंगसह अतिरिक्त कर्मचारी तैनात

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : नैऋत्य रेल्वेअंतर्गत कॅसलरॉक ते कुलेमदरम्यान घाट भागामध्ये वारंवार पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. याबाबत नैऋत्य रेल्वेने खबरदारी घेतली आहे. गत जुलै महिन्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेल्वेचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बेळगाव-अनमोड महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली. याची दखल घेऊन नैऋत्य रेल्वेने रेल्वे मार्गावरील उपाययोजनाही कडक केल्या आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

जोरदार पावसामुळे अनमोड घाटातातील दुधसागर मंदिराजवळ सोमवारी (ता. ४) दोन ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे रामनगर गोवा महामार्ग वाहतुकीसाठी चार तास बंद होता. तसेच बससेवाही विस्कळीत झाली होती. महामार्ग असो वा रेल्वेमार्ग, घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कॅसलरॉक ते कुलेमदरम्यानचा परिसर पश्चिम घाटामध्ये मोडतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

दरम्यान, येथे सिंगल लाईन रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. रस्त्यावरील संपर्क नाही. सुमारे २७ किलोमीटरचा हा घाट (ब्रागांझा घाट) सेक्शन आहे. पावसाळ्यात या ठिकाणी लॅन्ड स्लाईड होते. याची पाहणी वारंवार केली जात आहे. या ठिकाणी लँन्ड स्लाईड होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अतिरिक्त सुरक्षेची उपाययोजना म्हणून ड्रोन कॅमेऱ्याने सर्वेक्षण करण्यात आले होते. यामुळे धोकादायक ठिकाणांची माहिती मिळण्यास मदत झाली. या मार्गावर पायी चालून वारंवार सर्वेक्षण केले जात आहे.

यानंतर ज्या ठिकाणी गरज आहे तेथे सिमेंटची भिंत बांधण्यात आली आहे. दरड कोसळणार नाही, याची काळजी नैऋत्य रेल्वे घेतली आहे. पावसाळ्यात खबरदारी म्हणून घाट विभागात याआधीच वाळूच्या पिशव्या, दगड व इतर साधने कॅस्टलरॅक, कुलेम व तिनईघाट येथे तयार ठेवण्यात आली आहेत. कॅसलरॉक ते कुलेमदरम्यान अतिरिक्त कर्मचारीही तैनात केले आहेत.

पावसामुळे नैऋत्य रेल्वेकडून घाट विभागात खबरदारी घेण्यात आली आहे. नाईट पेट्रोलिंग केले जात आहे. कॅसलरॉक ते कुलेमदरम्यान अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. संभाव्य धोका टाळण्याच्या विविध उपाययोजना केल्या आहेत.

- अनिश हेगडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैऋत्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT