Mohal robbery 
पश्चिम महाराष्ट्र

सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून मोहोळमध्ये चोरी

सकाळ वृत्तसेवा
मोहोळ (सोलापूर) : येथील मेनरोडवरील आंबेडकर चौकातील दोन सोनाराच्या दुकानांचे शटर उचकटुन रविवारी (ता. २९) मध्यरात्री चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भरवस्तीमध्ये मेनरोडवर श्री शारदा ज्वेलर्स हे शिवाजी वामनराव गायकवाड यांचे व अमोल ज्वेलर्स हे पंडीत यांचे सोन्या चांदीचे दुकाने आहेत. रविवार येथे मोहोळचा बाजाराचा दिवस असतो. रविवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास दुकानमालक शटरची सर्व कुलपे व्यवस्थीत लावुन घरी गेले होते. सोमवारी (ता. ३०) सकाळी दुकानाची शटरची समोरील पट्टी उचकटल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सबंधित दुकानमालकांना फोन करून ही माहीती दिली. दुकानाजवळ येताच दुकान मालकांना दुकाने फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत मोहोळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून घटनास्थळांची पाहणी केली. तेव्हा दुकानांच्या कुलुपांना लावणाऱ्या लोखंडी पट्टया छन्नी व हातोड्याच्या साह्याने तोडुन चोरटयांनी प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडे उलटी फिरवून चांदीच्या वस्तु, डी.व्ही.डी आदीची चोरी झाल्याचे दुकानमालकाकडुन प्राथमिक माहितीतुन सांगण्यात आले. साधारणतः ३ ते ४ किलो चांदीच्या वस्तु चोरीस गेल्याचा अंदाज आहे. चोरीची फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे. भर वस्तीत मेनरोडवरच चोरी झाल्यामुळे मोहोळमधील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT