इमारतीमध्ये पाणी गळती sakal
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा : आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये पाणी गळती

पाणी गळतीने बराच भाग ठिसूळः पावसाळ्यापूर्वी इमारतीच्या दुरुस्तीचे काम करावे

सकाळ वृत्तसेवा

वाळवा : जिल्ह्यात कामकाजात अग्रेसर असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या बऱ्याच भागाची पाणी गळतीने हानी झाली आहे. विशेष या आरोग्य केंद्रातील बहुतेक भागातील जमीन खचल्याने फरशांची मोठी नासधूस झाली आहे. आता मुख्य इमारतीच्या गच्चीवरून पाणी गळतीने बराच भाग ठिसूळ झाला आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या पावसाळ्याआधी इमारती दुरुस्तीचे काम होण्याची गरज आहे.

आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा, मुख्य लेखापाल कक्ष, जनरल वॉर्ड आणि अन्य ठिकाणी पाणी गळतीने मुख्य भिंती जीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, आरोग्य केंद्रातील अंतर्गत भाग दुरून अतिशय देखणा दिसतो; प्रत्यक्षात ठिकठिकाणी पाणी मुरून बराच भाग पडझडीच्या मार्गावर आहे. आरोग्य केंद्रात मुख्य शस्त्रक्रिया विभागाजवळ व्हरांड्याच्या भिंतीला वीजपुरवठा करणारी मोठी प्रभावळ आहे. पाणी गळतीने हा भाग तर शेवाळला आहे. पावसाळ्यात सतत पाणी गळती राहिली तर तो

मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मुख्य स्लॅबवरून पाणी गळतीने सगळी इमारत धोक्यात येणार आहे. इमारतीच्या छतावरील पाणी साठवण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना उभारण्यात आली, ज्यामुळे पावसाच्या पाण्याचा थेट जमिनीत निचरा होतो. मात्र या योजनेचा एकही थेंब प्रत्यक्ष जमिनीवर आला नाही. त्याउलट तो भिंतीतच पाझरला. आता त्या योजनेचे काही अवशेष बाकी आहेत.

या आरोग्य केंद्रात सामान्य रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार होतात. त्याशिवाय प्रसूती, प्रसूतिपश्चात शस्त्रक्रिया, आंतररूग्ण विभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. या ठिकाणी रुग्णांना रात्रंदिवस सेवा उपलब्ध असते. प्रत्येक पातळीवर हे आरोग्य केंद्र आघाडीवर आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी या आरोग्य केंद्राच्या समस्या सोडविण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT