पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण रुग्णांचा आकडाही वाढला 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. यातील नऊ जण शहरातील रहिवासी असून एक रुग्ण इंदोरी येथील, तर एक रुग्ण पुण्यातील आहे. आज दिवसभरात 568 रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या सहा हजार 73 झाली  आहे. आज दिवसभरात 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आज मृत्यू झालेल्या व्यक्ती शहरातील विठ्ठलवाडी (पुरुष वय ६७), आकुर्डी (पुरुष, वय ६३ व वय ७०), रहाटणी (पुरुष, वय ६२), पिंपरी (पुरुष, वय ५१ व ५३), चिंचवड (स्त्री, वय ४८), काळेवाडी (स्त्री, वय ५०), गांधीनगर पिंपरी (स्त्री, वय ३८) येथील रहिवासी होत्या. तसेच, मावळ तालुक्यातील इंदोरी येथील पुरुष (वय ६५) आणि पुण्यातील स्त्री (वय ६५) यांचाही मृत्यू झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएमसह आठ आणि खासगी आठ रुग्णालयांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 6073 झाली आहे. सध्या 2306 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 3681 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृतांची संख्या 86 झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, बीजे मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय एड्स निर्मूलन व संशोधन संस्था अर्थात नारी आणि महापालिकेचे वायसीएम रुग्णालय यांच्यासह खासगी सहा लॅबमध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात व लवकर रुग्ण शोधले जाऊ लागले आहेत. दररोज सरासरी एक हजार स्वॅब तपासणी केली जात आहे. 

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं. चिं. मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT