पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो दिवसेंदिवस धोका वाढतोय; आजचा कोरोना पॉझिटिव्ह अन् मृत्यूंचा आकडा पाहा

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आजचा सोमवार धक्कादायक ठरला. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ११५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. आज दिवसभरात २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८९७ झाली आहे. आजपर्यंत एकूण १०७९ जण बरे झाले आहेत. सध्या ७८५ जणांवर उपचार सुरू आहेत. आज पिंपरी संत ज्ञानेश्वर कॉलनीतील ५२ वर्षीय महिला, दापोडी येथील ५२ वर्षीय महिला, बोपोडीतील ७० वर्षीय महिला आणि मुळानगर खडकी येथील ७९ वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एकूण ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज पॉझिटिव्ह आढलेले रुग्ण, सिद्धार्थ नगर, सांगवी, कामगार भवन पिंपरी, शंकरनगर, अजंठानगर, पिंपळे निलख, दत्तनगर, तापकीरनगर, नढेनगर, मधुबन सोसायटी, संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी, सुदर्शन नगर, मोरेश्वर कॉलनी थेरगाव, सृष्टी चौक, विशालनगर, काटेपूरम चौक सांगवी, कोकणेनगर, नाशिक महामार्ग मोशी, दिघी रोड भोसरी, बोपखेल, किनारा हॉटेल दापोडी, मोरया पार्क चिंचवड, नवभारत नगर, संभाजीनगर, सोनिगरा सोसायटी चिंचवड स्टेशन, आदर्शनगर, पाटीलनगर, इंदिरानगर, बौद्ध नगर, वल्लभनगर, जयभीमनगर, पंचतारा नगर आकुर्डी, सिंधूनगर प्राधिकरण, देहूरोड, नेहरूनगर, फुलेनगर, वैशाली नगर, संत तुकाराम नगर पिंपरी, आकुर्डी गाव, चिंचवड स्टेशन, थेरगाव, दापोडी, देहू, विजयनगर, नानेकर चाळ पिंपरी, पुण्यातील मंगळवार पेठ येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पीसीएमसी बिल्डिंग निगडी, अजंठानगर, आनंदनगर, बौद्धनगर पिंपरी, भीमाशंकरनगर दिघी, लिंबोरे वस्ती, गवळीनगर, निगडी, साईबाबानगर चिंचवड आणि पारोळा (जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले रुग्ण 'कोरोनामुक्त' झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत, की अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही. याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त मास्क ठेवावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT