पिंपरी-चिंचवड

मावळ : झोळीत खेळताना लागला मुलाच्या गळ्याला फास!

१२ वर्षांच्या मुलाचा गळ्याला फास लागून दुर्दैवी मृत्यू.

रामदास वाडेकर

१२ वर्षांच्या मुलाचा गळ्याला फास लागून दुर्दैवी मृत्यू.

कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) : घरात बांधलेल्या साडीच्या झोळीत खेळणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाचा गळ्याला फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना येथील इंद्रायणी कॉलनीत सोमवारी (ता. ७) सायंकाळी घडली. दिनेश गुप्ता (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत आफरीन वसीम खान (रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

बुद्धिलाल जानकिप्रसाद गुप्ता हे पत्नी व चार मुलांसह खान यांच्या शेजारी राहतात. सोमवारी गुप्ता यांच्या घराच्या बाहेरील गेटला कुलूप होते. तसेच, त्यांच्या घराच्या गॅलरीत गुप्तांची मुले दिनेश व राज (वय ७) साडीच्या बांधलेल्या झोळीवर खेळत असल्याचे खान यांनी पावणेसातच्या सुमारास पाहिले होते. त्यांनी थोड्या वेळाने घराबाहेर येऊन पाहिल्यावर दिनेशच्या गळ्याला साडीचा फास लागलेला दिसला. खान यांनी लगेच भाऊ तौफिक याला गुप्तांच्या घराचे कुलूप तोडायला लावले. त्यानंतर दिनेशच्या गळ्यातील फास काढल्यावर तो जमिनीवर निपचित पडला. काहीही हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ! अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांसाठी कसोटीची परीक्षा; सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा?

Viral Video : लिफ्टमध्ये अडकल्या दोन लहान मुली! चिमूकलीने स्वतःला धोक्यात घालून वाचवला त्यांचा जीव, ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

भीतीने बोबडी वळेल! 'या' इंडोनेशियन Horror सिनेमाने ओलांडल्या भीतीच्या सीमा; YouTube वर रंगलीये याच चित्रपटाची चर्चा

Cat Treatment Dispute : मांजरीच्या औषधावरून नागपुरात राडा! क्लिनिकमध्ये घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; डॉक्टरलाही दिली जीवे मारण्याची धमकी, नक्की काय घडलं?

Tax Benefits: Tax वाचवायचा आहे? मग आयकर कायद्यातील ‘या’ 10 सवलतींचा घ्या फायदा; होईल लाखोंची बचत!

SCROLL FOR NEXT