Grampanchyat Election Sakal
पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या १९ जागांपैकी १५ जागा बिनविरोध

मावळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या १९ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा रिक्त राहिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या १९ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या असून एक जागा रिक्त राहिली आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या १९ जागांसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार होती. त्यासाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी अर्ज माघारीचा दिवस होता. दिवसभरात २२ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १९ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. त्या पुढील प्रमाणे- नाणोली तर्फे चाकण- शुभांगी दीपक लोंढे ( प्रभाग २, सर्व.स्त्री ), केवरे-हनुमंत निवृत्ती गोणते ( प्रभाग २, सर्वसाधारण ), औंढे खुर्द- रवी उर्फ गोपाळ मानकर (प्रभाग २, अनुसूचित जमाती), गोडुंब्रे- मनीषा विलास येवले (प्रभाग १, सर्व.स्त्री), टाकवे खुर्द- बाळासाहेब पंढरीनाथ पिंपरे ( प्रभाग ३, सर्वसाधारण ), आंबी- बायडाबाई बाबासाहेब घोजगे ( प्रभाग ३, सर्व.स्त्री ), करूंज- संतोष बाबू जाधव (प्रभाग २, अनुसूचित जमाती), नवलाख उंब्रे- विजया आप्पा शेटे (प्रभाग १, सर्व.स्त्री), बेबडओहळ- संदीप गणपत घारे ( प्रभाग ३, सर्वसाधारण ), सुधीर बबन गायकवाड ( प्रभाग ३, अनुसूचित जाती ), साळूंब्रे- सीमा राहुल राक्षे (प्रभाग ३, सर्व.स्त्री), जांबवडे- सागर केशव नाटक ( प्रभाग १, सर्वसाधारण ), सुनीता सोपान भांगरे ( प्रभाग २, सर्व.स्त्री ), मंगेश दिलीप भोसले ( प्रभाग २, सर्वसाधारण ), ठाकूरसाई- मंगल संतोष कारके ( प्रभाग २, सर्व.स्त्री ). उधेवाडी येथील अनुसूचित जमातीची जागा रिक्त राहिली आहे. आता केवळ मळवंडी ठुले, धामणे व साळूंब्रे येथील प्रत्येकी एका जागेसाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पुढील प्रमाणे- मळवंडी ठुले ( प्रभाग १, सर्व.स्त्री )- रोहिणी पंकज ठुले व वंदना ज्ञानेश्वर बेनगुडे, धामणे ( प्रभाग ३, अनु.जाती स्त्री )- मोनाली उर्फ सोनाली सुनील थोरवे व स्वीटी सतीश गायकवाड, साळूंब्रे ( प्रभाग २, सर्व.स्त्री )-सुजाता जगन्नाथ अनपट व अर्चना संतोष विधाटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Malad News : मालाड क्रीक येथील मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Manchar Protest : भावडी गावकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध; झाडांची तोड थांबवण्याची मागणी

त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

SCROLL FOR NEXT