Corona  
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी २२३ नवीन रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी २२३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख तीन हजार ४२१ झाली आहे. काल १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या९८ हजार ३६२ झाली आहे. सध्या तीन हजार २२८ सक्रिय रुग्ण आहेत.

काल शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. कालपर्यंत शहरातील एक हजार ८३१ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत १९ हजार ८६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार १९३ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील ५२७ घरांना काल स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार २६१ जणांची तपासणी केली. ७७९ जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख ३० हजार ७६९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

काल एक हजार ७६ संशयित रुग्णालयात दाखल झाले. ४५५ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. ६२५ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कालपर्यंत सहा लाख ४९ हजार ४७७ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ४४ हजार ३५५ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख ४३ हजार ९२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काल मृत्यू झालेली शहरातील व्यक्ती काळेवाडी (वय 73) येथील रहिवासी आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT