Rape News esakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad Crime : धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, २३ वर्षीय नराधमाला अटक

Pimpri Chinchwad crime news : पिंपरी चिचवडच्या हिंजवडी परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काउंटरचे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. यादरम्यान पिंपरी चिचवडच्या हिंजवडी परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंजवडी परिसरात सोमवारी सायंकाळी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून ओम जयचंद पुरी या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी हा मूळचा मराठवाड्यातील धारशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहे. इलेक्ट्रिशीयन म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासार, सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महिला सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर आपल्या फ्लॅटसमोर चालली होती. यावेळी सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कामासाठी आलेल्या ओमने वृद्ध महिलेचे तोंड दाबले व तिला सहव्या आणि सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत फरफटत नेले. गळा दाबून मारहाण करत लैंगिक अत्याचार केले.

पाऊण तास हा प्रकार सुरू होता. मात्र महिलेने आरडाओरड केल्याने सोसायटीमधील रहिवासी बाहेर आल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या भीषण प्रकारानंतर कुटुंबियांनी तत्काळ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT