पिंपरी-चिंचवड

सॅनिटायझर वापरलं...मास्क अन् ग्लोजही घातले, तरी कोरोनानं गाठलं; तेही एक-दोन जणांना नव्हे...

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : ते सॅनिटायझर वापरत होते. वेळोवेळी हात धुत होते. मास्क वापरत होते. प्रसंगी ग्लोजही वापरत होते, तरीही त्यांना कोरोनाने गाठले... असे एक नव्हे, दोन नव्हे तब्बल पंचवीस जण आहेत. तेही महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी. इतकी काळजी घेऊनही त्यांना संसर्ग झाला मग, सर्व सामान्यांनी किती काळजी घ्यायला हवी, किती सावधानता बाळगायला हवी, याचा अंदाज येतो.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज दीडशेहून अधिक व्यक्तींना संसर्ग होतो आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सत्तावीसशेच्या जवळपास पोचली आहे. मृत्यूदरही वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य व वैद्यकीय विभाग कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू आहे. गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही लोक ऐकत नाहीत. 'काय होतंय?' किंवा 'काही होत नाही' अशा आविर्भावात अनेक जण फिरताना दिसत आहेत. अशा व्यक्तींनी महापालिका कर्मचारी, अधिकारी यांचा आकडा बघावा की ज्यांनी कोरोना होऊ नये, यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली तरीही त्यांना संसर्ग झाला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका सेवेतील पंचवीस जणांना कोरोना संसर्ग झालेला आहे. संसर्ग झालेल्यांमध्ये वायसीएमचे एक डॉक्टर आहेत. दोन नर्स आहेत. दोन वॉर्डबॉय आहेत. काही सफाई कर्मचारी आहेत. एक उपअभियंता आहेत. एक कनिष्ठ अभियंता आहेत. इतरांमध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील काही कर्मचारी आहेत. ते वेळोवेळी सॅनिटायझर वापरत होते. वेळोवेळी हात धुत होते. मास्क वापरत होते. प्रसंगी ग्लोज वापरत होते. डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय तर पीपीई किट वापरत होते.  तरीही त्यांना कोरोनाने गाठले आहे. या वरून त्याचे गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळायला हवे. मास्क नियमितपणे वापरातला हवे. तरच आपण सुरक्षित राहू शकतो अन्यथा कोरोनाचे शिकार व्हायला वेळ लागणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: यंदा मुंबईची तुंबई नाहीच! अंधेरी सबवे लवकरच जलमुक्त होणार, महापालिकेचा मोठा प्लॅन

RBI Governor: महागाई वाढणार? पेट्रोल-डिझेलबाबत गव्हर्नर मल्होत्रा यांचे मोठे वक्तव्य; नेमके काय म्हणाले?

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत फलंदाजांची उडाली त्रेधातिरपीट! पहिल्याच दिवशी पडल्या तब्बल १६ विकेट्स; VIDEO

तुमच्या आरोग्याशी खेळ! कचऱ्याच्या समस्येमुळे महाराष्ट्राची पीछेहाट; पर्यावरणाबाबत सरकार उदासीन का?

Karnataka Cabinet Row : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच डी.के शिवकुमार यांना मोठा झटका, ज्येष्ठ मंत्र्याचा राजानीमा; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT