Corona patients in pimpri city esakal
पिंपरी-चिंचवड

Corona Patients : कोरोनाचे पिंपरी शहरात ३३ रुग्ण; नवीन व्हेरियंटचे रुग्ण नाहीत

पिंपरी शहरात कोरोनाचे ३३ रुग्ण सक्रिय आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील

पिंपरी - शहरात कोरोनाचे ३३ रुग्ण सक्रिय आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून, त्यातील ३२ रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे तर उर्वरित एका रुग्णावर आकुर्डी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या जेएन १ या व्हेरियंटची लक्षणे या रुग्णांमध्ये नाहीत.

सर्दी खोकल्याचेही रुग्ण वाढले

गेल्या महिन्यापासून शहरात थंडी वाढलेली आहे, वातावरणही बदलत आहे. त्यामुळे शहरात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यात ही संख्या लक्षणीयरित्या वाढली असून, गरज वाटल्यास या रुग्णांचीही कोरोनाची तपासणी केली जात आहे. बहुतांश चाचण्या या नकारात्मक येत आहेत. मात्र, ज्यांना कोरोना झालेला आहे, त्यांच्यामधील लक्षणेही सौम्य असल्याने घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलेले आहे.

अशी घ्या काळजी

- सर्दी खोकला झाल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत

- बाहेर पडताना व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे

- सर्दी खोकला झालेल्यांनी बाहेर पडणे टाळावे

- सोशल डिस्टंसिंग पाळावे

- सॅनिटायझरचा वापर करावा

महापालिकेच्या रुग्णालयात तयारी

नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या जेएन १ या व्हेरियंटचा शहरात एकही रुग्ण नाही. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेच्या शहरातील आठ रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

ऑक्सिजन, औषधांचा साठा यांची चाचपणी करण्यात आलेली असून, गरज पडल्यास या रुग्णालयातही कोरोनाच्या रुग्णांसाठी बेडस् उपलब्ध करून दिले जातील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. एका रुग्णावर आकुर्डी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या महापालिकेच्या वतीने या रुग्णालयातच कोरोनाच्या रुग्णांना भरती केले जात आहे. मात्र, भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यास इतर रुग्णालयातही वॉर्ड सुरू करण्यात येईल.’

- डॉ. श्रीकांत सुपेकर, वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT