पिंपरी-चिंचवड

पिंपरीत आज 37 नवे पॉझिटिव्ह; आनंदनगरसह कोणकोणत्या परिसरातील रुग्ण आहेत पाहा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मंगळवारी (ता. 26) 427 झाली. दिवसभरात 37 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात आनंदनगर चिंचवड, रुपीनगर, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, वाल्हेकरवाडी, भाटनगर येथील रुग्णांचा समावेश आहे. गेल्या तेरा दिवसांत आनंदगरमधील 134 रुग्ण आढळले आहेत. त्यात आज आढळलेल्या 17 जणांचा समावेश आहे. तसेच, आंबेगावमधील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

सोमवारी (ता. 25) दिवसभरात 38 रुग्ण आढळलेले होते. ते आनंदनगर- चिंचवड, जुनी सांगवी, रुपीनगर, काकडे पार्क-चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, भाटनगर-पिंपरी, बौद्धनगर-पिंपरी, किवळे भागातील होते. त्यात 19 पुरुष व 19 महिलांचा समावेश होता. तसेच, पुण्यातील एक पुरुष व एका महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. आज आनंदनगर चिंचवड, रुपीनगर, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, भाटनगरमध्ये पुन्हा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. सध्या रुग्णालयात शहरातील 245 व पुण्यातील 29 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रुग्णालयांत शहरातील 23 जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शहरातील सात जणांचा मृत्यू झालेला आहे. पुण्यात आणि वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 450 झाली आहे. आज चऱ्होलीतील तीन रुग्णांना चौदा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आनंदनगरमध्ये तपासणी :

आजपर्यंत आनंदनगर-चिंचवड परिसरातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील संशयित व लक्षणे असलेल्या नागरिकांची कोरोनापूर्व तपासणी मोबाईल लॅबद्वारे केली जात आहे. सोमवारी दिवसभर केलेल्या तपासणीत आढळले 86 संशयितांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे तपासण्यासाठी पाठवले होते. त्यांचे अहवाल आज आले. त्यानुसार 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सील केलेले भाग : 

चिंचवड : प्रेस्टिंग बिल्डिंग- काकडे रेसिडेन्सी- परफेक्‍ट वॉर सर्व्हिसेस- मुंबई-पुणे महामार्ग- मॉडर्न सायकल कंपनी. 

काळेवाडी : पवनानगर गल्ली नंबर एक- गल्ली नंबर चार- कोकणरत्न मित्र मंडळ- निकिता जनरल स्टोअर्स. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT