पिंपरी-चिंचवड

पिंपरी : युडायस अपडेट न केल्यामुळे शाळांवर ही कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : प्रत्येका माध्यमांच्या शाळांना मान्यता आवश्‍यकता असते आणि शाळेची शासन दरबारी मान्यता टिकवून ठेवण्यासाठी, युडायस पल्समध्ये शाळेची माहिती भरून देणे आवश्‍यक असते. परंतु, पिंपरी चिंचवड शहरातील 657 पैकी निव्वळ 195 शाळांनीच युडायस पल्स क्रमांक प्रमाणित करून घेतला. मात्र, उर्वरित 462 शाळांनी अद्याप युडायस क्रमांक अद्यावत न केल्यामुळे शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शिक्षण विभागाकडून वेळोवेळी सूचना देऊन व प्रलंबित यादीतील अनेक शाळांनी अद्याप शाळेचा युडायस क्रमांक प्रमाणित करून घेतला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांना शाळेला कारवाईचा इशारा दिला आहे. शहरातील 657 पैकी 195 शाळांनी प्रमाणित केले आहे. शाळांनी प्रमाणित केल्याशिवाय दरवर्षी सप्टेंबरमध्ये संचमान्यता, शालेय विकास आराखडा, शालेय पोषण आहार माहितीसह शाळेची भौतिक सुविधांची माहिती अपडेट करावयाची असते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस युडायस प्लस ही 2020-21 शैक्षणिक वर्षीची माहिती भरुन देणे आवश्‍यक असते. लॉकडाउनमुळे 
शिक्षकांनी ऑनलाइन एप्रिल महिन्यामध्ये द्वितीय संकलित मूल्यमापनानुसार गुणपत्रक तयार करणे, संकलित, आकारिक मूल्यमापन नोंदवही तयार करणे हे काम वेळेत पूर्ण केली, पण युडायस प्लस व इतर कामे ऐनवेळी सोपविल्याने कामाचा व्याप वाढल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शाळेचा यु-डायस क्रमांक, शाळेचा यूजर आयडी ,पासवर्ड आदी अपडेट करता आले नाही. प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे म्हणाल्या, "ज्या शाळांनी सर्टिफाय करून घेतले नाही, अशा शाळांना शिक्षण विभागामार्फत नोटीस दिली जाणार आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT