पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनामुळे वीस जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी (ता. 3) आणखी  घट झाली. सोमवारी 748 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 23 हजार 682 झाली आहे. तर एकाच दिवसात तब्बल वीस जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांपासून काही अंशी कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट दिलासादायक ठरत असली, तरी सोमवारी एकाच दिवशी वीस जणांचा मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये भोसरीतील 55 व 90 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, दापोडीतील 60 वर्षीय महिला व 70, 72 वर्षीय पुरुष, संगवीतील 92 व 27 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 67 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, पिंपळे गुरवमधील 30 व 61 वर्षीय पुरुष, थेरगावमधील 49, 59, 66 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 65 वर्षीय पुरुष, निगडीतील 64 वर्षीय पुरुष, फुगेवाडीतील 59 वर्षीय महिला, माणमधील 68 वर्षीय पुरुष, फुरसुंगीतील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजचा वैद्यकीय अहवाल

* दाखल झालेले संशयित रुग्ण - 770
* पॉझिटिव्ह रुग्ण - 748
* निगेटिव्ह रुग्ण - 54
* चाचणी अहवाल प्रतीक्षेतील रुग्ण - 1239
* रुग्णालयात दाखल एकूण संख्या - 3895
* कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - 727
*आजपर्यंत मृत्यू - 489
* आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या - 16206
* दैनंदिन भेट दिलेली घरे - 22154
* दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - 71288

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT