Pimpri_COVID19 
पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील 90 वर्षीय आजींची कोरोनावर मात; घरी परतल्यावर...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : जगण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि उत्तम प्रतिकार शक्तीच्या बळावर चिखली-म्हेत्रेवस्तीतील 90 वर्षीय आजी कोरोनावर मात करत आपल्या स्वकीयांमध्ये मंगळवारी (ता. १४) परतल्या. घरी परतलेल्या या आजींचे नागरिकांनी रांगोळी काढून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्यावर फुलांची उधळण अन् कुटुंबियांनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले.

मुक्ताबाई हिरामण पांचाळ असे या आजीचे नाव आहे. त्यांचा मुलगा माधव पांचाळ यांचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. व्यवसायात नागरिकांची आलेल्या संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाली. माधव यांच्या संपर्कात आलेल्या त्यांची आई मुक्ताबाई यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना थंडी, ताप, खोकला येऊ लागला. तसेच श्वास घेण्यासही अडचण येऊ लागली. यामुळे ३० जून रोजी त्यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर जवळपास १५ दिवस उपचार सुरू होते. मात्र, आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. मुक्ताबाई या कोरोनावर मात करून आपल्या घरी आल्या. त्यावेळी त्या राहत असलेल्या सिंहगड कॉलनी येथील नागरिकांनी रांगोळी काढून फुले टाकून आणि टाळ्या वाजून जोरदार स्वागत केले.

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

SCROLL FOR NEXT