पिंपरी-चिंचवड

आयटीयन्ससाठी हा 'आधार' ठरणार महत्त्वाचा

सुधीर साबळे

पिंपरी : कोरोनाच्या संकटामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आलीय. अशांना हात देण्यासाठी नॅशनल इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटने आधार अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत कोणतेही कारण न देता आयटी कंपनीमधून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. अचानक नोकरी गेल्यामुळे हे कर्मचारी संभ्रमात पडले आहेत. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी संघटनेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले.

नोकरी गेलेल्या आयटीयन्सनी तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे त्यांची माहिती संघटनेकडे आहे. या कर्मचाऱ्यांचा बायोडेटा अपडेट करणे, कॉलसेंटर, बीपीओ, आयटी कंपन्या याठिकाणी कोणत्या नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध असल्यास त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, अशा प्रकारचे काम या आधार अभियानातून करण्यात येत आहे. लॉकडाउन शिथिल होऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा अर्थचक्राला गती येऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काळात बीपीओ, आयटी कंपन्या, आदी ठिकाणी नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून या आयटीयन्सना मदत करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सलुजा यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फोनच्या माध्यमातून समुपदेशन... 

अचानकपणे नोकरी गमावल्यामुळे चिंतेत असणारे अनेक आयटीयन्स आपली कैफियत मांडत असतात. त्यांचे फोनच्या माध्यमातून समुपदेशन करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचा आतापर्यंतचा कामाचा अनुभव आदी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली जाते. आता निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्‍यक आहे. याचे मार्गदर्शन करण्यात येते. अनेकजण फेसबुकच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधत असतात, त्यांना देखील मार्गदर्शन करत असतो. समुपदेशनासाठी दररोज आमच्याकडे येणाऱ्या कॉल्सची संख्या 30 पर्यंत असल्याचे सलुजा यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कामगार आयुक्‍तांकडे पाठपुरवठा सुरु... 

आयटीयन्सना अचानक नोकरीवरुन कमी करणे, पगार कपात करणे, अशा प्रकारच्या तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे करण्यात आल्या आहेत, त्या लवकर निकाली काढण्यासंदर्भात संघटनेचा कामगार आयुक्‍तांकडे पाठपुरवठा सुरु आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT