Criminal
Criminal Sakal
पिंपरी-चिंचवड

तरुणाला जमिनीवरील बिस्किटे खाऊ घालणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

सकाळ वृत्तसेवा

'मला भाई का नाही म्हणाला' या कारणावरून सराईत गुन्हेगाराने व त्याच्या साथीदारांनी थेरगावातील गणेशनगर येथेएकाला इमारतीच्या टेरिसवर नेऊन कमरेचा बेल्ट व लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.

पिंपरी, - 'मला भाई का नाही म्हणाला' या कारणावरून सराईत गुन्हेगाराने (Criminal) व त्याच्या साथीदारांनी थेरगावातील गणेशनगर येथे एकाला इमारतीच्या टेरिसवर नेऊन कमरेचा बेल्ट व लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण (Beating) केली. जमिनीवर बुस्किटे (Biscuits) टाकून खाण्यास भाग पाडले. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक (Arrested) करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव ), आदित्य काटे (रा. ताथवडे ), प्रकाश इंगोले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून रोहन वाघमारे अद्याप फरार आहे. याप्रकरणी वीस वर्षीय तरुणाने फिर्याद दिलेली आहे. आरोपी व फिर्यादी हे दोघे ऐकमेंकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी रोहन याने फिर्यादीला फोनवर शिवीगाळ करून भेटण्यासाठी बोलविले. त्यानुसार फिर्यादी मंगळवारी (ता. २५) रात्री साडे अकराच्या सुमारास गणेशनगर आले.

रोहन तू का मला फोनवर शिवीगाळ केली. अशी विचारणा फिर्यादीने आरोपीला केली. याचा आरोपीला राग आला. व 'तू मला रोहन का म्हणालास , मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे' असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करीत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. दरम्यान, इतर आरोपींनीही फिर्यादीला शिवीगाळ करीत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. या आरोपींची रविवारी (ता. ३०) घटना घडलेल्या परिसरातून धिंड काढण्यात आली.

दरम्यान, आरोपींना तपासकामी घटनास्थळी आणले होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT