pit.jpg 
पिंपरी-चिंचवड

सार्वजनिक ठिकाणी थुंकताय का? मग ही बातमी वाचाच

पितांबर लोहार

पिंपरी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न घालणाऱ्यांविरोधात महापालिका आरोग्य विभागाकडून 23 एप्रिलपासून कारवाई सुरू आहे. 30 जूनपर्यंत एक हजार 910 जणांकडून थुंकल्याप्रकरणी दोन लाख 86 हजार 500 रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या 991 जणांकडून चार लाख 95 हजार 500 असा सात लाख 82 हजार रुपये दंड वसूल केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. थुंकीद्वारे प्रसार वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क वापरणे अत्यावश्‍यक केले आहे. या नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर महापालिका आरोग्य विभागातर्फे कारवाई केली जात आहे. थुंकणाऱ्यांकडून दीडशे रुपये व मास्क न घालणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जात आहे. त्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालय स्थरावर पथके नियुक्त असून पोलिसांच्या मदतीने कारवाईची मोहीम राबविली जात आहे. 

नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून वारंवार केले जात आहे. तरीही काही नागरिकांकडून उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टंसिंगसुद्धा पाळले जात नाही. त्यामुळे महापालिकेला कारवाईचा बडगा उचलावा लागला आहे. 23 एप्रिल ते 23 जून 2020 या दोन महिन्यात महापालिकेने एक हजार 682 थुंकीबहाद्दरांवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून दोन लाख 52 हजार 300 रुपये दंड वसूल केला होता. तर, मास्क न घालणाऱ्या 720 जणांकडून तीन लाख 69 हजार 500 रुपये दंड वसूल केला होता. गेल्या 24 जूनपासून कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसांत थुंकल्याप्रकरणी 228 तर, मास्क न घातल्याप्रकरणी 271 जणांवर कारवाई केली आहे. 

प्रभागनिहाय कारवाईचा विचार केल्यास "अ' प्रभागाने थुंकल्याप्रकरणी दोन महिन्यात 275 जणांवर कारवाई केली होती. तर, "ब' प्रभागाने 141, "क' प्रभागाने 158, "ड' प्रभागाने 270, "इ' प्रभागाने 117, "फ' प्रभागाने 165, "ग' प्रभागाने 309 आणि "ह' प्रभागाने 247 जणांवर कारवाई केली होती. तसेच, मास्क न घालणाऱ्या 50 जणांवर "अ' प्रभागाने कारवाई केली होती. अशीच कारवाई "ब' प्रभागाने 58, "क' प्रभागाने 94, "ड' प्रभागाने 69, "इ' प्रभागाने 19, "फ' प्रभागाने 16, "ग' प्रभागाने 347 आणि "ह' प्रभागाने 86 जणांवर कारवाई केली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT