पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी एवढ्या जणांवर कारवाई  

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (ता. 6) एकाच दिवसांत तब्बल 326 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. निगडी पोलिस ठाण्यांतर्गत सर्वाधिक 57 जणांवर कारवाई करण्यात आली. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून, संचारबंदी व जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्‍यक कामाव्यतिरिक्त शहरात फिरण्यास मनाई आहे. तरीही अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. विनाकारण घराबाहेर न पडण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाणेनिहाय झालेली कारवाई :
- निगडी (57), भोसरी एमआयडीसी (17), भोसरी (24), पिंपरी (16), चिंचवड (44), आळंदी (13), चाकण (2), दिघी (22), सांगवी (9), वाकड (20), हिंजवडी (56), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (13), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली 22), रावेत चौकी (9).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT