पिंपरी-चिंचवड

कोरोना ड्यूटी नको म्हणणाऱ्या शिक्षकांवर आता अशी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना 'कोरोना ड्यूटी' लावली आहे. मात्र, भीतीपोटी ही ड्यूटी टाळण्यासाठी शेकडो शिक्षकांनी आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देत कामातून पळ काढला आहे. मात्र, त्यांची बनवाबनवी प्रशासनाकडून उघडकीस आल्यावर 74 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चार शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करून सेवापुस्तकात नोंद करत कारवाईचा बडगा उगारलेला आहे. 

कोरोनासारख्या गंभीर संकट काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 'जलद प्रतिसाद टिम' तयार करण्यात आली आहे. त्या पथकाकडून शहरात दररोज सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. या गठित केलेल्या पथकांत डॉक्‍टर, आरोग्य विभागातील कर्मचारी निवड केली आहे. यासाठी शिक्षण विभागाचीदेखील मदत घेतली जात आहे. त्यांना शाळांमधल्या विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापन आणि नागरिकांवर देखरेख ठेवणे, निवारागृहातील नागरिकांच्या नोंदी ठेवणे, स्क्रीनिंग करणे, घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करणे, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रॅकिंग करणे, व्हॉट्‌सऍपसारख्या समाज माध्यमांमधून जनजागृती करणे, आपत्ती निवारण कक्षातले कामकाज पाहणे अशा कामांची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यातील हजारो कर्मचारी इमानेइतबारे 'कोरोना ड्यूटी' निभावत आहेत. मात्र, काही उपशिक्षक, क्रीडा शिक्षक, लिपिक आणि अनुरेखक यांनी आपत्तीच्या काळात काम करायला नकार दिला आहे. तर चार शिक्षकांनी कोरोनाच्या भीतीने कंटेन्मेंट भागात जाण्यास नकार दिला. ऑर्डरच स्वीकारली नाही, तर 100 शिक्षकांनी यातूनच पळवाट म्हणून आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रच महापालिका प्रशासनाकडे सादर केली. मात्र, प्रशासनाच्या चौकशीच्या जाळ्यात बनवाबनवी करणारे शिक्षक आपसूकच सापडले. अशा 74 जणांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. यात खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचादेखील समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"ज्यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. अशांच्या सेवापुस्तकात लालशाईचा शेरा मारण्यात आला आहे. प्रशासनाकडून चार शिक्षकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे.'' 
- राजेश आगळे, प्रशासन अधिकारी, महापालिका 

आकडे बोलतात (महिनावार प्रशासनाकडून कारवाई) 

  • महिना.......नोटीस बजावलेल्या व्यक्ती 
  • मार्च...........22 
  • एप्रिल.........11 
  • मे...............14 
  • जून............27 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड

शिव ठाकरेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घराला भीषण आग; थोडक्यात वाचला अभिनेता, व्हिडिओमधून दाखवली परिस्थिती

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिमेतील सॉरेंटो टॉवरमध्ये आग; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

SCROLL FOR NEXT