पिंपरी-चिंचवड

खबरदार! 'या' भागातील कर्मचाऱ्यांना कामावर बोलवाल तर...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नोकरीच्या निमित्ताने शहरात असणारे परराज्यातील आणि राज्याच्या अन्य शहरातील कर्मचारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आपल्या गावाला निघाल्यामुळे अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही भागातल्या कंटेन्मेंट झोनमध्ये राहाणारे कर्मचारी या भागातील कंपन्यांमध्ये काम करताना आढळल्यास संबधित आस्थापनेला कारवाईचा सामना करावा लागणार आहे. 

राज्य सरकाने ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी केलेल्या नियमावलीमध्ये रेड झोनमधल्या कंटेन्मेंट झोनमध्ये राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्‍तांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या नियमांचे उल्लघन करून कोणी कंटेन्मेंट झोनमध्ये राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत असल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान, परराज्यात राहाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने पुढाकार घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून इथे अडकून पडलेले कर्मचारी आता आपल्या गावी परतू लागले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्य सरकारने देखील एसटी बसच्या माध्यमातून अन्य राज्याच्या सीमांपर्यंत नागरिकांना पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याखेरीज राज्याच्या अन्य भागातील शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांसाठी एसटी बसची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून इथे अडकून पडलेले मजूर, कर्मचारी आता घरी जाऊ लागले असून, ही संख्या मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कंपन्यांना आता मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा संसर्ग अधिक असल्यामुळे त्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील कर्मचाऱ्यांवर निर्बंध आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT