वडगाव मावळ, ता. २१ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने शहर परिसरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली.
घाटकोपर (मुंबई) येथे होर्डिंग कोसळण्याच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वडगाव नगरपंचायतीने शहरातील सर्व होर्डिंगची प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत होर्डिंगमालकांना नोटीस दिल्या होत्या. सात दिवसांच्या आत नवीन स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल नगर पंचायत कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनधिकृत होर्डिंगधारकांनी विहित नमुन्यात परवानगी घ्यावी अन्यथा अनधिकृत होर्डिंग तत्काळ काढून घ्यावे, अशा सूचना केल्या होत्या. तसेच रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत असणाऱ्या होर्डिंगधारकांनी या कार्यालयाकडून परवानगी घेतली असल्यास त्यांची एक प्रत व स्ट्रक्चरल ऑडिट केल्याच्या अहवालाची एक प्रत नगरपंचायत कार्यालय जमा करावी. अन्यथा शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग नगरपंचायतीमार्फत काढून टाकण्यात येईल व येणारा खर्च होर्डिंगधारकांकडून वसूल करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात करण्यात आली. डॉ. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत सहाय्यक नगररचनाकार लक्ष्मण माने, कार्यालयीन अधीक्षक संदीप सोनवणे, साजिद विराणी, सहाय्यक अभियंता समाधान पवार, सोमनाथ आगळे, अशोक गायकवाड आदींसह इतर नगरपंचायत कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.