पिंपरी-चिंचवड

पहिल्या दिवशी गृहप्रवेश अन् दुसऱ्या दिवशी घर जमीनदोस्त! 

रमेश मोरे

जुनी सांगवी : "वास्तुशांती करून मंगळवारी (ता. 9) गृहप्रवेश केला. अन्‌ दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 10) डोळ्यांसमोर आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला,'' असे सांगत ममतानगर येथील रहिवासी लीलावती बलराज संजना धाय मोकलून रडत होत्या. मूळ हैदराबादेतील असलेले हे तेलुगू कुटुंब 40 वर्षांपासून कामानिमित्त शहरात आले आहेत. नऊ सदस्य असलेल्या या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी किंवा व्यवसायात नाही, मोलमजुरी करून त्यांनी कष्टाने घर उभारले होते. 

लीलावती यांचा तीन मुलांचा एकत्रित परिवार आहे. यात एक रिक्षाचालक, एक मुलगा अपंग; तर तिसरा खासगी कामे करतो. तिघांनी पैसे जोडून जागा घेत घर बांधले. आयुष्यभराची सर्व जमापुंजी व कर्ज काढून घरावर लावली. त्या जागेत त्यांनी काही वर्षे पत्रा शेडमध्ये राहून काढली. आता नव्या घरात ते राहणार होते, मात्र, एवढ्या दिवसांचे बघितलेले स्वप्न दोन दिवसात जमीनदोस्त झाले. आता जायचे कुठे, राहायचे कसे? असे अनेक प्रश्‍न या कुटुंबाला पडले आहेत. 

संसार ढिगाऱ्याखाली... 
कारवाईदरम्यान, संजना परिवाराला घरातील साहित्य बाहेर काढायला ही वेळ मिळाला नाही. संपूर्ण संसार ढिगाऱ्याखाली गाडल्याने केवळ अंगातील कपड्यानिशी त्यांना बाहेर निघावे लागले. जमीनदोस्त झालेल्या घरासमोरच संजना कुटुंबीय हताशपणे बसले होते. 

मधुबन सोसायटीमध्ये पाच इमारतींवर कारवाई 
महापालिका अतिक्रमणविरोधी पथकाकडून बुधवार आणि गुरुवारी (ता. 11) बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली. दोन दिवसात एकूण 17 बांधकामे पाडली. मधुबन सोसायटी परिसरातील पाच इमारतींवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. 

घरातील सर्व साहित्य, मुलांची शाळेची कागदपत्रे व इतर महत्त्वाचे कागदपत्रे ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. साहित्य काढायलाही वेळ मिळाला नाही. रात्र नातेवाइकाकडे काढावी लागली. आता बेघर झाल्याने काय करावे, कुठे जावे, सुचत नाही? 
- प्रवीण संजना, रिक्षाचालक 
 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT