Adjust the amount of penalty in the amount of income tax Said PCMC Deputy Commissioner Smita Jagde
Adjust the amount of penalty in the amount of income tax Said PCMC Deputy Commissioner Smita Jagde 
पिंपरी-चिंचवड

मिळकतकराच्या रकमेत शास्तीची रक्कम समायोजित

सकाळवृत्तसेवा

पिंपरी :  शहरातील एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शंभर टक्के तर, एक ते दोन हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांचा पन्नास टक्के शास्ती (दंड) सरकारने माफ केला आहे. मात्र, ज्यांनी शास्ती भरला आहे, त्यांची रक्कम पुढील मिळकतकरामध्ये समायोजित केली जाणार आहे, असे महापालिका करसंकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.

एक हजार स्क्वेअर फुटांपर्यंत अनधिकृत बांधकाम असलेल्या 54 हजार मिळकती शहरात आहेत. तर, एक ते दोन हजार स्क्वेअर फुटांपर्यंत अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती 15 हजार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांची मागणी व महापालिकेचा निर्णय यामुळे सरकारने दोन वर्षांपूर्वी अगोदर पाचशे स्क्वेअर फुटांपर्यंत व नंतर एक हजार स्क्वेअर फुटांपर्यंतच्या बांधकामाची शास्ती माफ केली. त्यानंतर एक ते दोन हजार स्क्वेअर फुटांपर्यंत शंभर ऐवजी पन्नास टक्के शास्ती आकारण्याचा निर्णय घेतला. मात्र, शास्ती व मिळकतकर आकारणीचा प्रशासनाचा तगादा म्हणून तर काहींनी स्वेच्छेने शास्तीची रक्कम भरली आहे. अशा व्यक्तींची शास्तीची रक्कम पुढील मिळकतकराच्या रकमेत समायोजित केली जाणार आहे. मात्र, दोन हजार स्क्वेअर फुटांपेक्षा अधिक बांधकाम केलेल्या नागरिकांवर शास्ती आकारली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT